Marathi News> विश्व
Advertisement

Google ने बनवलेल्या दुर्बीणचा डूडल तुम्ही पाहिलात का? खूपच रंजक आहे याची कहाणी

अमेरिकेची अंतराळ एजंन्सी नासा(NASA) च्या जेम्स वेब स्पेस टेलीस्कोप (JWST) द्वारे काढलेल्या ब्रम्हांडच्या आत्तापर्यंतच्या सर्वात डीप फोटोंचा गूगलने डूडल बनवला आहे.

Google ने बनवलेल्या दुर्बीणचा डूडल तुम्ही पाहिलात का? खूपच रंजक आहे याची कहाणी

NASA James Webb Space Telescope First Image Google Doodle : अमेरिकेची अंतराळ एजंन्सी नासा(NASA) च्या जेम्स वेब स्पेस टेलीस्कोप (JWST) द्वारे काढलेल्या ब्रम्हांडच्या आत्तापर्यंतच्या सर्वात डीप फोटोंचा गूगलने डूडल बनवला आहे. गूगलने या फोटोंचा एक छोटा व्हिडीओ बनवला आहे. यामध्ये NASA ने प्रदर्शित केलेले 5 सर्वोत्तम फोटो शेअर केले आहेत. हे फोटो विश्वातले आजपर्यंतचे सर्वात सुंदर फोटो आहेत असं सांगितलं जात आहे.

मानवाच्या इतिहासातली सर्वात मोठी इंजिनीअरिंग 

JWST द्वारे काढलेल्या या फोटोंना मानवाच्या इतिहासातील सर्वात मोठी इंजिनीअरिंग असल्याचं मानलं जात आहे. याला शास्रज्ञांनी 'गोल्डन आय' म्हणजेच 'सोन्याचा डोळा' असं म्हटंल आहे. या फोटोंमध्ये अंतराळातील वातावरण दाखवण्यात आलं आहे. जेम्स वेब स्पेस हा इतिहासातला सर्वात मोठा, सर्वात शक्तिशाली इंफ्रारेड टेलीस्कोप आहे. याला नासाने अंतराळात ठेवण्यात आलं आहे. डूडल पाहा-

JWST हा पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर लांब प्रदक्षिणा घालतोय

नासाने या वेब स्पेस टेलीस्कोपला 2021 च्या डिसेंबर महिन्यात लाँच केलं आहे. याच्या निर्मितीसाठी 10 अरब डॉलर येवढा खर्च आला आहे. तुम्हाला ऐकूण आश्चर्य वाटेल की हा टेलीस्कोप पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर लांब सुर्याभोवती प्रदक्षिणा घालतोय. NASA ने दुसऱ्या एडमिनिस्ट्रेटर जेम्स ई वेबच्या नावाच्या आधारावर JWST चं नामकरण केलं आहे. त्यांनीच अपोलो मिशनचं नेतृत्व केलं होतं. फ्रेंच गुयानाच्या गुयाना स्पेस सेंटरमधून JWST ला लाँच केलं होतं. याला पृथ्वीपासून आपल्या कक्षापर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास एका महिन्याचा कालावधी लागतो.

Read More