Marathi News> विश्व
Advertisement

जगातील ती Mysterious Train जी बोगद्यात गेल्यानंतर पुन्हा बाहेर आलीच नाही, पण...

ट्रेन आणि प्लॅटफॉर्मशी संबंधित अनेक रहस्यमय कथा तुम्ही ऐकल्या असतील. पण सर्वात चर्चेत आणि भयानक घटना घडली ती इटालियन ट्रेन सोबत जी प्रवाशांसह गायब झाली. 

जगातील ती Mysterious Train जी बोगद्यात गेल्यानंतर पुन्हा बाहेर आलीच नाही, पण...

मुंबई : ट्रेन आणि प्लॅटफॉर्मशी संबंधित अनेक रहस्यमय कथा तुम्ही ऐकल्या असतील. पण सर्वात चर्चेत आणि भयानक घटना घडली ती इटालियन ट्रेन सोबत जी प्रवाशांसह गायब झाली. ही घटना 1911 ची आहे, ज्यामध्ये एकूण 106 प्रवाशांना घेऊन जाणारी ट्रेन बोगद्यात प्रवेश करताच अचानक गायब झाली होती. ही ट्रेन त्यानंतर कुठे गेली हे आजपर्यंत कोणालाच कळू शकलेलं नाही.

या ट्रेनबद्दल असे सांगितले जाते की, झानेट्टी नावाची ट्रेन 1911 मध्ये रोमन स्टेशनमधून बाहेर पडली होती. दरम्यान, ट्रेन एका बोगद्यातून जाणार होती, मात्र ट्रेन बोगद्याच्या आत तर गेली, परंतु ती तेथून बाहेर आली नाही. या घटनेनंतर ट्रेनची खूप शोधाशोध करण्यात आली, मात्र त्यासंबंधीत काहीही सापडले नाही. ज्यानंतर ही ट्रेन एक गुढं मीस्ट्री म्हणून राहिली आहे. (Mysterious Italian Train)

या ट्रेनबद्दल असं देखील सांगितलं जातं की, त्यामधील दोन प्रवासी नंतर सापडले होते आणि त्यांनी या ट्रेनबद्दल धक्कादायक दावा केला. या प्रवाशांनी सांगितले की, अचानक खूप धूर येऊ लागली आणि काहीही दिसणं बंद झालं होतं, ज्यामुळे त्यांनी घाबरुन ट्रेनमधून उडी मारली आणि त्यांचे प्राण वाचले. यानंतर ट्रेन बोगद्यात घुसली आणि ती सापडली नाही.  (Mysterious Italian Train)

या रहस्यमय घटनेबद्दल असे म्हटले जाते की, ही ट्रेन आपल्या वेळेपेक्षा 71 वर्षे मागे गेली आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही ट्रेन 1840 मध्ये मेक्सिकोला पोहोचली होती. या कारणास्तव याला भूत ट्रेन देखील म्हणतात.

fallbacks

मेक्सिकोमधील एका डॉक्टरने दावा केला आहे की, ती काम करत असलेल्या रुग्णालयात सुमारे 104 रुग्णांना रहस्यमयरीत्या दाखल करण्यात आले होते. मात्र, सर्वांनाच वेड लागल्याचेही सांगण्यात आले. सर्वजण रेल्वेने आल्याची माहिती त्यांनी फक्त दिली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तोपर्यंत रोमहून थेट मेक्सिकोला जाण्यासाठी असा कोणताही रेल्वे मार्ग नव्हता.

आणखी एक आश्‍चर्यकारक गोष्ट म्हणजे हे लोक मेक्सिकोत आल्याची कोणतीही नोंद नव्हती. ट्रेनची ही विचित्र घटना आजही जगासाठी एक गूढच आहे. ही ट्रेन इटली, रशिया, जर्मनी आणि रोमानियाच्या अनेक भागात पाहिल्याचा दावा करण्यात आला आहे.

Read More