Marathi News> विश्व
Advertisement

Corona Impact : बऱ्याच काळानंतर कामावर परतलेल्या वैमानिकाकडून चुका, मोठी दुर्घटना घडण्याची भीती

कोरोना प्रकोपानंतर विमान सेवा सुरू तर  झाली पण वैमानिकांवर आली अशी परिस्थिती

Corona Impact : बऱ्याच काळानंतर कामावर परतलेल्या  वैमानिकाकडून चुका, मोठी दुर्घटना घडण्याची भीती

अमेरिका :  कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीमध्ये, जगभरातील लोकांनी आयुष्य पुन्हा नव्याने जगायला सुरूवात केली आहे. कर्मचाऱ्यांनी आता कार्यालयांमध्ये परतण्यास सुरुवात केली आहे, अनेकांनी व्यवसाय सुरू केला आहे. पण 18 महिन्यांपेक्षा जास्त काळ घरी बसलेले वैमानिक विमान उडवायला विसरले आहेत. अनेक वैमानिक स्वतः म्हणतात. ते म्हणतात की इतके दिवस घरी बसल्यानंतर त्यांना विमान उडवताना अडचणींना सामोरे जावे लागले. म्हणूनच अनेकांना पुन्हा प्रशिक्षण घ्यावे लागत आहे.

ब्लूमबर्ग एजन्सीच्या मते, कोरोना महामारीमुळे विमान सेवा बंद होत्या. आता सर्वकाही पूर्वपदावर येत आहे. पण यादरम्याना वैमानिकांना विमान उडवताना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. कोणाला विमान सुरू करण्यात अडचण आली, तर काहींना लँडिंग करताना, तर काही वैमानिक दुसरे इंजिन सुरू करण्यास विसरले. 

प्रसंगी तज्ज्ञांकडून मदत घेतल्यानंतर अनर्थ टळला. अन्यथा मोठा अपघात होऊ शकला असता. या दोन्ही चुका अमेरिकेच्या एका नामांकित विमान कंपनीच्या वैमानिकाने केल्या. अमेरिकेत वैमानिकांवर एक सर्वेक्षण करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय अहवालांनुसार, अनेक वैमानिकांची स्थिती जवळपास सारखीच होती. 

अनेक कारणांनंतर, आंतरराष्ट्रीय नागरी उड्डयन संघटनेने वैमानिकांसाठी प्रशिक्षण सत्र सुरू करण्याचा विचार केला आहे. दरम्यान वैमानिकाने आशियासह इतर ठिकाणी पुन्हा प्रशिक्षण घेतले, परंतु त्यांनी प्रशिक्षण सत्रात देखील अनेक चुका केल्या. यामुळेच प्रशिक्षण सत्र पूर्ण केल्यानंतरही वैमानिकांकडून चुका होत आहेत.

 2020 मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात पसरल्यानंतर आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घालण्यात आली. कोरोनाचा उद्रेक पाहता, जगभरातील देशांनी आंतरराष्ट्रीय उड्डाणे थांबवले. यामुळे वैमानिकांनाही फार काळ उड्डाण करता आले नाही. आता कोरोनाचा प्रभाव थोडा कमी होऊ लागला आहे, उड्डाणे देखील सुरू केली जात आहेत. पण या दरम्यान अमेरिकेत अनेक वैमानिकांच्या चुका समोर आल्या आहेत.

Read More