Marathi News> विश्व
Advertisement

आईच्या दुधात मायक्रोप्लास्टिक? चिमुकल्या जीवांना कॅन्सरचा धोका?

संशोधकाच्या इशाऱ्याने जगभरात खळबळ, डॉक्टरांनी दिला इशारा

आईच्या दुधात मायक्रोप्लास्टिक? चिमुकल्या जीवांना कॅन्सरचा धोका?

Trending News : आईचं दूध हे नवजात बाळांच्या स्वास्थ्यासाठी सर्वात चांगला आहार मानलं जातं. या दूधानेच बाळाची भूक भागत असते, त्यामुळे डॉक्टर गरोदर मातांना स्तनपानाचा सल्ला देतात.  मात्र आता याच दुधात मायक्रोप्लास्टिक आढळल्यानं सारं जग हादरून गेलंय. इटलीच्या शास्त्रज्ञांनी हा धक्कादायक दावा केला आहे. 

या शास्त्रज्ञांनी अनेक मातांच्या चाचण्या केल्या. या महिलांनी बाळाला जन्म दिल्यानंतर यातील 75 % दुधात प्लास्टिकचे कण आढळल्याचं संशोधनात निष्पन्न झालंय. तज्ज्ञांच्या मते प्लास्टिकमध्ये अनेक वेळा थॅलट नावाचं हानिकारक रसायन आढळतं. त्यामुळे नवजात बाळांना कॅन्सर, पोटाचे विकार अशा अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. 

हे धक्कादायक संशोधन समोर आल्यानंतर शास्त्रज्ञांनी गर्भवती महिलांना गर्भधारणेदरम्यान प्लास्टिकच्या डब्यांमध्ये दिलेलं कोणतंही अन्न खाऊ नये असा इशारा दिलाय. यासोबतच खाण्यापिण्याबाबतही काळजी घेण्याचा सल्लाही दिलाय. मानवी शरीरात प्लास्टिक सापडणं ही निश्चितच गंभीर बाब आहे. याचे भावी पिढीवर गंभीर परिणाम दिसू शकतात. 

Read More