Marathi News> विश्व
Advertisement

पोटदुखीला कर्करोग समजला, गुगलवर लक्षणं सर्च केली अन् नंतर उचललं टोकाचं पाऊल...

Trending News Today: एका तरुणाला पोटदुखीचा त्रास होत होता. मात्र, त्याच्या मनात वेगळीच भीती बसली अन् त्याने... 

पोटदुखीला कर्करोग समजला, गुगलवर लक्षणं सर्च केली अन् नंतर उचललं टोकाचं पाऊल...

Trending News Today: वेळी-अवेळ जेवणे व बदलती लाइफस्टाइल यामुळं आरोग्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. कधीकधी याचमुळं काही जण उगाचच घाबरुन जातात. आरोग्याच्या छोट्या-मोठ्या तक्रारी निर्माण झाल्या तरी एखादा गंभीर आजार झालाय का यामुळं ते चिंतेत असतात. त्यामुळं कधी कधी डिप्रेशनदेखील येते. याच डिप्रेशनमुळं मनात आत्महत्येचे विचार येतात. असाच एक प्रकार रोम शहरातील बेतोसानी येथील एका तरुणासोबत घडला आहे. अति विचार करण्याच्या सवयीमुळं त्याच्यावर जीव गमावण्याची वेळ आली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ते पोटदुखीच्या समस्याने त्रस्त होते. मात्र, यामुळं तो चिंतीत होता त्यातूनच त्याने धक्कादायक पाऊल उचलले होते. 

या तरुणाने एक दिवस त्यांच्या पत्नीला म्हटलं की, बॉललरसाठी जळण आणायला आउटहाइसमध्ये जातोय. मात्र, काही वेळातच त्याच्या पत्नीला त्याने एक टेक्स्ट मेसेज केला. त्यात लिहलं होतं की सॉरी आणि तु एक खूप चांगली पत्नी आहेस. हा मेसेज पाहून त्याच्या पत्नीला काही तरी चुकीचं घडतंय याची जाणीव झाली आणि काहीतरी गडबड आहे असं जाणवलं. ती तातडीने आउटहाउसच्या दिशेने धावली. तिथे तिला जे दृष्य दिसलं त्याने तिच्या पायाखालची जमिनच हादरली आहे. 

महिला जेव्हा आउटहाउसमध्ये पोहोचली तेव्हा तिने पाहिलं की, पतीच्या हातात अँगल ग्राइंडर असून त्याचा डावा हात पूर्णपणे कापला होता. पतीला या अवस्थेत पाहून पत्नी चांगलीच घाबरली होती. पत्नीने घाबरून रुग्णवाहिकेला फोन केला त्यानंतर लगेचच पॅरामेडिक्सची एक टीम त्यांच्या घरी पोहोचली. त्यानंतर त्याला लगेचच मावोरमती काउंटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे प्लास्टिक सर्जरीच्या टीमने पुन्हा त्याचा हात यशस्वीरित्या जोडण्यात आला. त्यानंतर त्याला इयासी येथील दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टर त्याच्या डाव्या भातामध्ये पुन्हा मुव्हमेंट परत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. 

तरुणाने इतकं मोठं पाउल का उचचलं या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यानंतर जे कारण पुढं आले त्याने त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. तरुण गेल्या काही दिवसांपासून पोटदुखीने त्रस्त होता त्यानंतर त्याने पोटदुखीच्या लक्षणांबाबतही गुगलवर सर्च केले तेव्हा त्याला खात्री झाली की त्याला पोटाचा कर्करोग असू शकतो. आपल्याला कर्करोग झालाय का या भीतीने तो डिप्रेशनमध्ये गेला त्याने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचाही विचार केला नाही. कर्करोग असल्याचे समजून त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला. आउटहाउसमध्ये त्यांने आत्महत्येचा प्रयत्नही केला पण वेळेत त्याची पत्नी तिथे पोहोचल्याने अनर्थ टळला. 

रोमानियाई प्रेसच्या रिपोर्टनुसार, तरुणाच्या प्रकृतीत आता बऱ्यापैकी सुधार येतोय आणि कर्करोगाच्या चाचण्या केल्या जात आहेत. 

Read More