Marathi News> विश्व
Advertisement

KFC success story | एकदा दोनदा नाही तर तब्बल 1009 वेळा ठरले अपयशी, तरी वयाच्या 65 व्या वर्षी सुरू केला उद्योग; आज 150 देशांमध्ये हजारो स्टोअर्स

ज्या वयात लोकं निवृत्ती घेतात, त्या वयात एखाद्या व्यक्तीने मोठा उद्योग सुरू केला आहे. ती व्यक्ती म्हणजेच केएफसीचे (Kentucky Fried Chicken) संस्थापक कर्नल सॅंडर्स (colonel Harland Sanders)होय.

KFC success story | एकदा दोनदा नाही तर तब्बल 1009 वेळा ठरले अपयशी, तरी वयाच्या 65 व्या वर्षी सुरू केला उद्योग; आज 150 देशांमध्ये हजारो स्टोअर्स

मुंबई : एखादी व्यक्ती आय़ुष्यात आपल्या लक्षासाठी झापट्याने काम करते परंतु त्याला एकदा - दोनदा नाही तर तब्बल 1009 वेळा अपयश आलं असेल अशी उदाहरणं खुपच कमी आहेत. परंतु मागील अपयशाला न जुमानता पुन्हा त्याच ताकदीने आपल्या ध्येयासाठी उभं राहणं हे सगळ्यांनाच जमत नाही. परंतु जगात असेही व्यक्तीमत्व आहे की, ज्या वयात लोकं निवृत्ती घेतात, त्या वयात एखाद्या व्यक्तीने मोठा उद्योग सुरू केला आहे. ती व्यक्ती म्हणजेच केएफसीचे (Kentucky Fried Chicken) संस्थापक कर्नल सॅंडर्स (colonel Harland Sanders)होय.

वयाच्या 7 व्या वर्षी बनले कूक
कर्नल हरालॅंड सॅडर्सचा जन्म 1890 मध्ये अमेरिकेच्या इंडियानामध्ये झाला होता. वयाच्या 6 व्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. घरातील आर्थिक स्थिती नाजूक असल्याने सॅंडर्सची आई एका फॅक्टरीत काम करीत होती. सॅडर्स त्यावेळी आपल्या भावंडांची देखभाल करीत असे. त्यांच्या वयाच्या 12 व्या वर्षी त्यांच्या आईने दुसरे लग्न केले. परंतु सावत्र वडिलांशी पटत नसल्याने ते आपल्या काकूकडे राहत असत. तेव्हा ते एका शेतात काम करीत होते. त्यांनी 7 वीत असताना शिक्षण सोडले.

आयुष्यभर अनेक कामे
सॅंडर्सनी आयुष्यभर अनेक छोटे मोठे कामं केले. ते सैन्यात देखील भरती झाले होते. परंतु तेथून त्यांना काढण्यात आले. त्यानंतर त्यांनी काही काळ रेल्वेत काम केले. वयाच्या 19 व्या वर्षी लग्न केले. कालांतराने काही वादामुळे त्यांना रेल्वेतील नोकरी सोडावी लागली. त्यावेळी त्यांची पत्नी मुलांना घेऊन त्यांना सोडून निघून गेली.
त्यानंतर टायर विकने, जहाज चालवणे आदी अनेक कामं त्यानी केली.


सॅडर्सने कॉर्बिनमध्ये 1930 साली पहिल्यांदा गॅस स्टेशन खरेदी केले. तेथे त्यांनी प्रवाशांच्या आग्रहाखातर रेस्टॉरंट सुरू केले. चिकनशी संबधीत अनेक पदार्थ ते विकू लागले. या रेस्टॉरंटला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळू लागला. त्यांची जोरदार कमाई होऊ लागली. एकदा केंटकीचे गवर्नर 1950 मध्ये त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये आले त्यांना सॅडर्सच्या हातचे चिकन खुप आवडले. त्यामुळे त्यांना सॅंडर्सला कर्नल उपाधी दिली. त्यानंतर सॅडर्स कर्नल सॅंडर्स नावाने ओळखले जाऊ लागले.

रेस्टॉरंट बंद पडले
जेथे सॅंडर्सचे रेस्टॉरंट होते तेथून महामार्गाचे काम सुरू झाले. आणि त्यांचे रेस्टॉरंट तोडण्यात आले. त्यानंतर त्यांनी इतर रेस्टॉरंटला आपली रेसिपी विकण्याचा आणि त्यातून नफा कमावण्याची विचार केला. त्यांनी अनेक रेस्टॉरंट आणि हॉटेल्समध्ये जाऊन आपली रेसिपी दाखवली. परंतु 1009 वेळा त्यांची डील होण्यास अयशस्वी ठरली. त्यानंतर त्यांना होकार मिळाला. आणि केएफसी चा प्रवास सुरू झाला.

65 व्या वर्षी सुरू केले केएफसी
अशा पद्धतीने ते एका रेस्टॉरंटला आपली रेसिपी विकू लागले. त्यासाठीचे मसाल्याचे पॅकेट ते पाठवत असत. त्यामुळे त्यांची रेसिपी गुपित राहिली. आणि त्यांची उत्तम चव ग्राहकांना आकर्षित करीत असे. येथूनच केएफसी फेमस होऊ लागले. ऑक्टॉबर 1963 मध्ये एक वकील जॉन वाई ब्राउस जुनिअर आणि व्यापारी जॅक सी मॅसी यांनी सॅडर्सची भेट घेतली.आणि केएफसीचे राइट्स खरेदी करण्याची इच्छा व्यक्ती केली. सुरूवातीला त्यांनी मनाई केली. परंतु नंतर त्यांनी केएफसी 2 मिलियन डॉलरमध्ये जानेवारी 1965 मध्ये विकले.

डील अंतर्गत हे निश्चित झाले की, केंटकी फ्राइड चिकन कंपनी आपले स्वतःचे रेस्टॉरंट जगभरात बनवेल आणि कधीही क्वॉलिटीशी तडजोड करणार नाही. सॅडर्सला संपूर्ण आयुष्य 40 हजार डॉलरचा पगार देण्याचीही डील करण्यात आली. त्यानंतर त्यांचा पगार वाढून 75 हजार डॉलर करण्यात आला होता. त्यानंतर ही कंपनी रेनॉल्डस आणि पेप्सिको सारख्या अनेक कंपन्यांकडे गेली. सध्या या कंपनीचा मालकी हक्क 'यम ब्रांड्स इनकॉर्पोरेशन'कडे आहे. 

कर्नल सॅडर्स यांचे निधन 1980 मध्ये झाले. आज कर्नल सॅडर्स जगात नाही परंतु केएफसीवर दाढी आणि खास वेस्टर्न टायमधील त्यांचा चेहरा दिसतो. हा चेहरा केएफसीचे चिकन खाणाऱ्यांना नेहमीच आठवणीत राहतो. केएफसीचे आज 150 देशांमध्ये 22 हजाराहून अधिक स्टोअर आहेत.

Read More