Marathi News> विश्व
Advertisement

काबूल विमानतळ तिसऱ्यांदा हादरलं; स्फोटाची आतापर्यंत संपूर्ण माहिती

 तलिबानची सत्ता स्थापन झाल्यानंतर काबूल विमानतळवर तिसऱ्यांदा हल्ला

काबूल विमानतळ तिसऱ्यांदा हादरलं; स्फोटाची आतापर्यंत संपूर्ण माहिती

काबूल : अफगाणिस्तानमध्ये तालिबानींची सत्ता स्थापन झाल्यापासून तिथेल नागरिकांचं जीवन धोक्यात आहे. गुरूवारी संध्याकाळी काबूल विमानतळावर दोन बॉम्बस्फॉट झाले. पहिला स्फोट अंतरराष्ट्रीय विमानतळ के एबी गेटच्या बाहेर झाला आहे, तर दुसरा स्फोट विमानतळाबाहेर असलेल्या बॅरेन हॉटेल बाहेर झाला आहे. या बॉम्बस्फोटात अमेरिकन सैनिकांसह एकूण 72 लोक ठार झाले आहेत, तर 140 लोक जखमी असल्याची माहिती मिळत आहे. स्फोटात मारले गेलेल्यांमध्ये अमेरिकेचे सैनिक असल्याचं पेंटागनने सांगितलं आहे. 
 
यास्फोटामध्ये  11 यूएस मरीन्स आणि वायूदलाचे एक वैद्यकिय कर्मचारी यांचा समावेश आहे. महत्त्वाचं म्हणजे या हल्ल्याची जबाबदारी कथित इस्लामिक स्टेटने घेतली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी हा हल्ला घडवून आणला आहे. हल्ल्यापूर्वी पश्चिमी सरकारने अफगाण नागरिकांना विमानतळापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. 

अफगाणिस्तानात कार्यरत असलेल्या इस्लामिक स्टेट गटाशी संलग्न आईएस-के  अतिरेक्यांकडून धमकी देण्यात आली आहे, अशी चेतावणी देण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांना हल्ल्यांची पूर्ण माहिती देण्यात आली. अमेरिका सध्या अफगाणिस्तनामधील सर्व हलचालींवर नजर ठेवून आहेत. 

दरम्यान, परराष्ट्र व्यवहार आणि राष्ट्रीय सुरक्षा धोरण समित्यांच्या सदस्या ऍलिसिया केर्न्स यांनी सांगितले, 'बॅरेन हॉटेलजवळ झालेल्या हल्ल्यात अधिक लोक जखमी झाले आहेत.' या हल्ल्यात महिला आणि लहान मुल देखील ठार झाले असून तालिबानी देखील जखमी झाले आहेत.

Read More