Marathi News> विश्व
Advertisement

EMI सकट सगळी गणितं फिस्कटली; 'या' बड्या कंनीकडून 10 मिनिटांच्या Video Call मध्ये 400 कर्मचाऱ्यांना नारळ

Job Layoff : सर्वकाही सुरळीत सुरु असताना नोकरीवरून अचानक घरचा रस्ता दाखवणं ही हादरवणारी बाब असते. असंच घडलंय एका मोठ्या कंपनीमध्ये....   

EMI सकट सगळी गणितं फिस्कटली; 'या' बड्या कंनीकडून 10 मिनिटांच्या Video Call मध्ये 400 कर्मचाऱ्यांना नारळ

Job Layoff : नोकरदार वर्गापुढं असणाऱ्या अडचणी अनेकदा काहींच्या लक्षात येत नाहीत. अमुक एका ठिकाणी जीव ओतून काम करणं, तिथं स्वत:चं स्थान निर्माण करून ते टिकवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणं, जीवनातील ध्येय्याच्या दिशेनं वाटचाल करणं या अशा कैक गोष्टींचा सामना नोकरदार मंडळी दर दिवशी करत असतात. तुलनेनं सरकारी नोकरी असणाऱ्यांना काहीसा दिलासा असतो. पण, खासगी क्षेत्रातील नोकरदारांवर मात्र सतत कोणत्या न कोणत्या संकटाची टांगती तलवार असते. 

मागील काही वर्षांपासून जगभरात असणारं (Recession) आर्थिक संकट आणि आर्थिक मंदी पाहता या मंदीचे परिणाम नोकरपातीच्या स्वरुपात दिसून येत आहेत. अनेक बड्या संस्थांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना एकएकी कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये आणखी एका कंपनीचा समावेशही झाला आहे. Bell या Telecommunications क्षेत्रातील मोठ्या कंपनीकडून एकाच वेळी तब्बल 400 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्यात आलं आहे. 

कंपनीच्या या निर्णयानंतर कॅनडातील कामगार संघटना 'युनिफॉर'नं या कृतीचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. हा लाजिरवाणा निर्णय असून तो या शब्दात वर्णन करण्यापलिकडला वाईट निर्णय असल्याचं या संघटनेनं म्हटलं आहे. कर्मचाऱ्यांना प्रतिप्रश्न करण्याची परवानगीही न देता कंपनीकडून त्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेण्यात आला. 

हेसुद्धा वाचा : Monsoon 2024 : दुष्काळाचं सावट असणाऱ्या महाराष्ट्राला दिलासा; 'हे' दोन महिने मान्सून गाजवणार

 

दरम्यान, संस्थेवर होणारे हे गंभीर आरोप पाहता आपल्या वतीनं या बाबतीत कायमच पारदर्शकता पाळण्यात आल्याचं bell कडून सांगण्यात आलं. कामगार संघटनेलाही साधारण आठवड्याभरापूर्वी याची कल्पना देण्यात आल्याचं कंपनीनं स्पष्ट केलं. शिवाय ज्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आलं त्यांना HR शी वैयक्तिक पातळीवर संवाद साधून पगाराच्या एकूण रकमेसंदर्भातील चर्चाही करण्याची मुभा देण्यात आल्याचं स्पष्टीकरण कंपनीनं दिलं. 

फेब्रुवारीमध्येच दिलेले कर्मचारी कपातीचे संकेत

फेब्रुवारी महिन्यातच दूरसंचार क्षेत्रात काम करणाऱ्या या कंपनीकडून येत्या काळात 4800 पदांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कमी करत कंपनी साधारण 9 टक्के कर्मचारी कपात करण्याच्या विचारात असल्याचा इशारा देण्यात आला होता. "simplify our organization and accelerate our transformation" असं म्हणत या निर्णयाबाबत कंपनीचे सीईओ मिरको बिबिक यांनी आपली बाजू मांडली होती. 

कामगार संघटनेच्या माहितीनुसार या कंपनीमध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या तुलनेनं जास्त होती. दरम्यान, शेअर होल्डर आणि कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळावर असणाऱ्यांचे खिसे भरण्यासाठी कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणं हे निंदनीय असल्याची सणसणीत टीका Unifor या कामगार संघटनेनं केली. 

Read More