Marathi News> विश्व
Advertisement

...अन् तो गरुड कोल्ह्याला घेऊन हवेत झेपावला; Video पाहून अनेकांनी तोंडात घातली बोटं

Eagle Flies Away With Fox Viral Video: हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनेकांनी हे असं काही पाहायला मिळेल असं आम्हाला अपेक्षित नव्हतं असं म्हटलं आहे. तर काहींनी हे फारच भयानक अन् अंगावर रोमांच उभं करणारं आहे असं म्हटलं आहे.

...अन् तो गरुड कोल्ह्याला घेऊन हवेत झेपावला; Video पाहून अनेकांनी तोंडात घातली बोटं

Eagle Flies Away With Fox Viral Video: 'थांबला तो संपला' किंवा 'Survival of the fittest' म्हणजेच 'सर्वात शक्तीशाली किंवा सक्षम असणाऱ्यांचा निभव लागतो' हे निसर्गाचे नियम आहेत. त्यातही जंगलामध्ये हा नियम फारच जवळून अनुभवायला मिळतो. अनेक व्हायरल व्हिडीओ आणि डिस्कव्हरी किंवा नॅशनल जिओग्राफीसारख्या चॅनेल्सवरील अनेक कार्यक्रमांमध्ये या दोन्ही वाक्यांचा प्रत्यय करुन देणारे अनेक क्षण पहायला मिळतात. जंगलातील स्पर्धेत मागे पडणारा मारला जातो हे निसर्गाचा नियम आहे. अनेक शिकारी हे अशा दुर्बल आणि मागे पडलेल्यांनाच आपलं लक्ष्य करुन पोटाची भूक भागवतात. अशाच एका शिकाऱ्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

व्हिडीओत काय दिसतंय?

एका मोठ्या आकाराच्या गरुडाने चक्क एका कोल्ह्याची शिकार केल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ जुना असला तरी सोशल मीडियावर तो पुन्हा व्हायरल झाला आहे. तसा गरुड हा चाणाक्ष आणि चपळ शिकारी म्हणून ओळखला जातो. कोणत्याही आकाराचा प्राणी जो आपल्याला लक्ष्य करणं शक्य आहे अशा प्राण्याला हा पक्षी शिकार करतो. अनेकदा तुलनेनं थोड्या मोठ्या आकाराच्या प्राण्यांची शिकार करुन आपल्या पिल्लांना त्यांचं मांस देण्याचा या पक्षाचा प्रयत्न असल्याचं दिसतं. अशाच हेतूने एका गरुडाने कोल्ह्याची शिकार केली.

लटकलेल्या अवस्थेत कोल्ह्याचा मृतदेह पाहून अनेकजण थक्क

कोल्ह्याची शिकार केल्यानंतर त्याला पंजांमध्ये धरुन हा गरुड डोंगराच्या कठड्यावर बसल्याचं दिसून येत आहे. अचानक हा गरुड या पूर्णपणे वाढ झालेल्या कोल्ह्याला पंजांमध्ये घेऊन आकाशात झेप घेतो. हा गरुड जेव्हा उडतो तेव्हा त्याच्या दोन्ही पंजांनी त्याने या मेलेलेल्या कोल्ह्याला घट्ट पकडलं आहे. गरुड झेप घेतो त्यावेळी या कोल्ह्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. एवढ्या जास्त वजनाची शिकार हे गरुड अगदी सहज आपल्या पंजांमध्ये पकडून घेऊन जात असल्याचं पाहणं अंगावर रोमांच उभा करणारा अनुभव आहे असं अनेकांनी म्हटलं आहे. 

अनेक कमेंट्स अन् 3.4 मिलियन व्ह्यूज

गरुड अशापद्धतीने शिकार करत असेल असं कधी वाटलं नव्हतं, असं या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना एकाने म्हटलं आहे. अन्य एकाने हे फारच आश्चर्यकारक आहे असं म्हटलंय. या व्हिडीओला 5 हजारांच्या आरपास रिट्वीट मिळाले असून एकूण व्ह्यूज हे 3.4 मिलियन्सच्या घरात आहेत.

Read More