Marathi News> विश्व
Advertisement

इस्त्रायलच्या आक्रमकतेनंतर 72 तासात हमास गुडघ्यावर, युद्धबंदीवर चर्चा करण्यास तयार

इस्रायलने हमासविरुद्ध सुरू असलेल्या लढ्यात आक्रमक पावित्रा घेतला आहे. गाझा पट्टीला वेढा घातल्याने तिसऱ्या दिवशीही वीज, इंधन आणि खाद्यपदार्थांचा पुरवठा बंद आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेविरुद्धच्या निर्णायक युद्धात इस्रायलने तीन लाख राखीव सैनिकही उतरवले. दबाव वाढल्याने अवघ्या 72 तासांमध्ये हमासने गुडघे टेकले आहेत. हमासने इस्त्रायलसमोर युद्धबंदीचा प्रस्ताव ठेवला आहे. 

इस्त्रायलच्या आक्रमकतेनंतर 72 तासात हमास गुडघ्यावर, युद्धबंदीवर चर्चा करण्यास तयार

Hamas attack: इस्रायलने हमासविरुद्ध सुरू असलेल्या लढ्यात आक्रमक पावित्रा घेतला आहे. गाझा पट्टीला वेढा घातल्याने तिसऱ्या दिवशीही वीज, इंधन आणि खाद्यपदार्थांचा पुरवठा बंद आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेविरुद्धच्या निर्णायक युद्धात इस्रायलने तीन लाख राखीव सैनिकही उतरवले. दबाव वाढल्याने अवघ्या 72 तासांमध्ये हमासने गुडघे टेकले आहेत. हमासने इस्त्रायलसमोर युद्धबंदीचा प्रस्ताव ठेवला आहे. 

आम्ही आमचे लक्ष्य गाठले गेले आहे. संभाव्य युद्धविरामावर आम्ही इस्रायलशी चर्चा करण्यास तयार आहोत, असे ज्येष्ठ नेते मुसा अबू मारझूक म्हणाले.

इस्रायल-हमास युद्धानंतर जगभरात सतत निदर्शने होत आहेत. कोणी इस्रायलला पाठिंबा देत आहे. तर कोणी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ उभा आहे. त्याचप्रमाणे ब्रिटनमध्येही युद्धानंतर दोन गट तयार झाले असून त्यांच्यात हाणामारी झाली. राजधानी लंडनमधील हाय स्ट्रीट केन्सिंग्टन ट्यूब स्टेशनवर ही घटना घडली.

युद्धासंदर्भात पॅलेस्टिनी प्राधिकरणाच्या अध्यक्षांनी संयुक्त राष्ट्र प्रमुख गुटेरेस यांच्याशी चर्चा केली हमासने शनिवारी सकाळी इस्रायलवर बॉम्बफेक करण्यास सुरुवात केली, जी अजूनही सुरूच आहे. यानंतर इस्रायलनेही हमासला चोख प्रत्युत्तर दिले असून त्यात आतापर्यंत सुमारे 1300 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, पॅलेस्टाईन प्राधिकरणाच्या अध्यक्षांनी संयुक्त राष्ट्र प्रमुखांशी चर्चा केली. इस्रायलचे हल्ले थांबवावेत, अशी विनंती त्यांनी संयुक्त राष्ट्र प्रमुखांना केली. शिवाय, इस्रायलवरील हमासच्या हल्ल्यासाठी अमेरिका इराणला जबाबदार धरते.

हमासने युद्धबंदीचा प्रस्ताव ठेवला असला तरी 'आता माघार नाही' अशा भूमिकेत इस्रायल दिसत आहे.त्यामुळे इस्रायल-हमास युद्ध आता पुढे कोणते वळण घेणार हे येणाऱ्या काळात समोर येईल. 

Read More