Marathi News> विश्व
Advertisement

Iran Bomb Blast : सुटकेस बॉम्बस्फोटनं इराण हादरलं; सर्वत्र मृतदेहांचा खच, 20 मिनिटांच्या आत दोन बॉम्बस्फोट

Iran Bomb Blast : इराणमधील करमान शहरात सिलसलेवार येथे दोन लागोपाठ बॉम्बस्फोटांमुळे हाहाकार माजला होता. या स्फोटात 100 हून अधिक नागरिक मृत्यूमुखी पडल्याचे कळत आहे.

Iran Bomb Blast : सुटकेस बॉम्बस्फोटनं इराण हादरलं; सर्वत्र मृतदेहांचा खच, 20 मिनिटांच्या आत दोन बॉम्बस्फोट

Blasts near Cemetery in Iran News In Marathi : इराणमध्ये माजी लष्कर कमांडर कासिम सुलेमानी यांच्या चौथ्या पुण्यतिथिनिमित्त बुधवारी इराणमध्ये नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. याचदरम्यान या परिसरात दोन बॉम्बस्फोट झाले. या स्फोटात तब्बल 100 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. तर या स्फोटांमध्ये 200 हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. दोन सुटकेसमध्ये बॉम्ब असल्याचे सांगितले जात आहे. 

बॉम्बस्फोटानंतरची भीषण परिस्थिती इराणी माध्यमांनी दाखवली आहे. प्रसारमाध्यमांच्या व्हिडिओंमध्ये रस्त्यांवर मृतदेहांचा खच पडलेला दिसत आहे. काही जखमी नागरिकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत होते. आणि बाकीचे लोक घटनास्थळापासून दूर पळताना दिसत होते.  केरमन रेड क्रिसेंट सोसायटीचे प्रमुख रझा फल्लाह यांनी पीटीआयला सांगितले की, आम्ही सर्व सुरक्षेचे उपाय केले होते तरीही बॉम्बस्फोट झाले. जेव्हा स्फोट झाला तेव्हा मोठा आवाज ऐकू आला. तो आवाज अतिशय भयंकर होता. आम्ही या हल्ल्याचा तपास करत आहोत.

सुलेमानीच्या कबरीत स्फोट कसा झाला?

केरमंचाच्या नायब राज्यपालांनी हा स्फोट दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले जात आहे. इराणची सरकारी वृत्तसंस्था तस्निमनने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, घटनास्थळी दोन्ही सुटकेसमध्ये बॉम्ब होते आणि त्यांचा स्फोट झाला. रिमोट कंट्रोलच्या मदतीने बॉम्बचा स्फोट केल्याची प्राथमिक माहिती मिळते. दरम्यान, इराणचे माजी कमांडर सुलेमानी यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी तिथे मोठ्या संख्येने नागरिक जमले होते दरम्यान, 20 मिनिटांच्या अंतरावर हे दोन स्फोट झाले, ज्यात सुमारे 100 लोक मृत्यूमुखी पडले असून 200 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले. इराणचे सर्वोच्च नेते खामेनी हे शत्रूंना चोख प्रत्युत्तर देतील असे म्हटले जात आहे. 

अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात सुलेमानी यांचा मृत्यू

इराणमध्ये सुलेमानिला यांना राष्ट्रीय नायक मानले जाते. सुलेमानी हे इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या विदेशी ऑपरेशन शाखा कुड्स फोर्सचे प्रमुख होते. 3 जानेवारी 2020 रोझी सुलेमानी म्हणजेच सिरियाला भेट दिली. तेथून इराकची राजधानी बगदादला पोहोचला. मात्र त्यांच्या भेटीची माहिती अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएला मिळाली होती. सुलेमानला पाठिंबा देणाऱ्या शिया संघटनेचे अधिकारी त्याला घेण्यासाठी विमानाजवळ पोहोचले. एक जनरल कासिम आणि दुसरा शिया आर्मी चीफ मुहांडिस होते. रात्रीच्या अंधारात, सुलेमानीची विमानतळावरून बाहेर पडत असताना एका अमेरिकन एमक्यू-9 ड्रोनने त्यांच्यावर क्षेपणास्त्र डागले आणि त्यांचा तत्काळ मृत्यू झाला.

Read More