Marathi News> विश्व
Advertisement

Warren Buffett : वॉरन बफेट देताहेत गुंतवणूकीचं रहस्य! तुम्ही श्रीमंत झालात म्हणून समजा

 हाच तो फॉर्म्यूला ज्यामुळे वॉरन बफेट बनले इंवेस्टटमेंट गुरु...

Warren Buffett : वॉरन बफेट देताहेत गुंतवणूकीचं रहस्य! तुम्ही श्रीमंत झालात म्हणून समजा

Warren Buffett Birthday : जगभरात इन्वेस्टमेंट (Investment Guru) गुरु म्हणून ओळख असणारे वॉरन बफेट (Warren Buffett) यांचा आज (30 ऑगस्ट) वाढदिवस आहे. इन्वेस्टमेंटच्या क्षेत्रातील त्यांच्या कर्तृत्वाने सर्वसामान्यांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढली आहे. त्यांच्या यशस्वी प्रवासाच्या प्रेरणेतून अनेकजणांनी उद्योग क्षेत्रात पदार्पण केलं आणि अजूनही करत आहेत. वॉरेन बफेट यांच्या यशाचा नेमका फॉर्म्यूला काय आहे? हे आज तुम्हालाही जाणून घेण्याची संधी मिळत आहे.

गुंतवणूक करताना दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवावा


शेअर बाजारात (Share Bazar) गुंतवणूक करताना, शेअर विकत घेऊन कमी काळात विकण्यापेक्षा चांगल्या कंपनीचे स्टॉक दीर्घकाळाच्या गुंतवणूकीसाठी खरेदी करावेत.  तुमची गुंतवणूक ही लाँग टर्म इन्वेस्टमेंटच्या (Long Term Investment) दृष्टिकोनातून असायला हवी.  जर तुम्ही योग्य कंपनीचे शेअर्स खरेदी केले तर, ही लाँग टर्म गुंतवणूक जास्त नफा मिळवून देऊ शकते.

रात्रीतून श्रीमंत होण्याचं स्वप्न पाहू नका


शेअर बाजारात (Share Bazar) गुंतवणूक करताना कमी कालावधीत श्रीमंत होण्याच्या लाससेमुळे तुम्ही चुकीच्या दिशेने जाऊ शकता. चांगला पोर्टफोलिओ (Portfolio) तयार करणं ही एक लांबलचक प्रक्रिया आहे. यासाठी खुप संयम असावा लागतो. शेअर बाजारतून तगडं रिटर्न मिळण्यासाठी तुम्ही अशा कंपनीचे शेअर खरेदी करावेत, ज्याचं बिझनेस मॉडेल (Business model) आणि मॅनेजमेंट (Management ) दोन्हीही चांगल्या दर्जाचं असायला हवं.

ध्येय ठरवून गुंतवणूक करा


गुंतवणूक (Investment) करताना ध्येय निश्चित करायला हवं. ध्येयविना केलेली गुंतवणूक ही नफा मिळवून देत नाही. तुमचं भांडवल योग्य विचार करुन योग्य त्या शेअरमध्ये गुंतवायला हवं. तुम्ही गुंतवलेलं भांडवल हे तुम्हाला कसा नफा मिळवून देणार याची तुम्हाला माहिती नसेल तर अशा गुंतवणूकीपासून दुर रहावं.

डायवर्सिफिकेशन (Diversification) समजून घ्या


आपल्याकडे असणारे सर्व अंडी एकाच टोपलीत ठेऊ नयेत. हिच ट्रिक गुंकवणूक करताना देखील वापरायला हवी. तुमच्याकडे असणाऱ्या भांडवलीच्या रक्कमेला अनेक भागात विभागालया हवं. तुमची पुर्ण रक्कमेची एकाच इ्क्विटीमध्ये (Equity) गुंतवणूक करु नका.

कमी किंमतीमध्ये शेअर खरेदी करा


एखाद्या कंपनीबद्दल तुम्हाला असं वाटलं की, कंपनीचं प्रोटक्ट चांगल्या दर्जाचं आहे आणि कंपनी आपल्या ग्राहकांना उत्तम सेवा देत आहे तर अशा वेळी तुम्ही त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करु शकता. वॉरन बफेट यांचं असं मत आहे की, एका चांगल्या कंपनीचे शेअर उत्तम किंमतींमध्ये खरेदी करण्यापेक्षा, एका उत्तम कंपनीचे शेअर चांगल्या म्हणजेच रिजनेबल किंमतीमध्ये खरेदी करायला हवेत.

Read More