Marathi News> विश्व
Advertisement

International Beer Day : बिअरला हिंदीमध्ये काय म्हणतात? बिअरबद्दल काही मनोरंजक गोष्टी तुम्हाला माहित आहे का?

हा दिवस ऑगस्टच्या पहिल्या शुक्रवारी साजरा केला जातो.

International Beer Day : बिअरला हिंदीमध्ये काय म्हणतात? बिअरबद्दल काही मनोरंजक गोष्टी तुम्हाला माहित आहे का?

मुंबई : आज जगात सर्वत्र International Beer Day साजरा केला जातो. हा दिवस ऑगस्टच्या पहिल्या शुक्रवारी साजरा केला जातो, जो या वर्षी 6 ऑगस्ट रोजी आहे. याची सुरुवात 2007 साली कॅलिफोर्निया, यूएसए मध्ये झाली. अशा परिस्थितीत बिअरच्या काही तथ्यांविषयी जाणून घेऊया.

बिअर कशी बनवतात?

बिअर बनवण्यासाठी साखर आणि किण्वन (Fermentation) चा वापर केला जातो. यानंतर, त्यात हॉप्स फ्लेर (Hops)  आणि नॅचरल प्रिजर्वेटिव टाकले जातात. अशा प्रकारे त्याचे कार्बोनेशन होते, ज्याद्वारे बिअर तयार होते.

बिअर तयार करण्याच्या प्रक्रियेला ब्रूइंग असे म्हटले जाते. हिंदीत याला किण्वासवन म्हणतात. तसेच ज्या ठिकाणी लोक बिअर तयार करतात त्याला  Brewery म्हणतात.

बिअर बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जौचे संस्कृत नाव 'यव' आहे. अशा त्यामुळे बिअरचे हिंदी नाव 'यवसुरा' आहे. त्याच वेळी, भारतीय उपखंडातील लोकांमध्ये बिअर 'आब-जौ' म्हणून ओळखली जाते.

यूकेच्या एका कंपनीने बनवलेला 'स्नेक व्हेनम' (Sanke Venom)ही जगातील सर्वात Strong बियर आहे. या बिअरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण 68 टक्क्यांपर्यंत आहे, जे त्याला खूप Strong बनवते.

जे लोक बिअर पितात त्यांना हे माहित नाही की,  त्यांना माहीत नसते की बिअरवर घट्ट होणाऱ्या फोमला काय म्हणतात. खरं तर, बिअरच्या वर येणाऱ्या फोमला बार्म (Barm) म्हणतात. बिअरची गुणवत्ता त्यावर अवलंबून असते.

बिअरला सर्वात पौष्टिक अल्कोहोल मानले जातो. संशोधक म्हणतात की, त्यात जीवनसत्त्वे, प्रथिने आणि खनिजे असतात. हेच कारण आहे की, बिअर आपल्या हाडांसाठी देखील फायदेशीर आहे. शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि हाडांच्या पेशी वाढवण्यासाठीही बिअर उपयुक्त आहे.

Read More