Marathi News> विश्व
Advertisement

कोरोनाची बनावट लस रोखण्यासाठी १६ देशांचे गुप्तचर विभाग एकत्र काम करणार

कोरोनाची बनावट लस रोखण्याचं आव्हान

कोरोनाची बनावट लस रोखण्यासाठी १६ देशांचे गुप्तचर विभाग एकत्र काम करणार

मुंबई : एकीकडे कोरोनावर वॅक्सीन आणण्याचं काम शेवटच्या टप्प्यात असताना आता कोरोनाची बनावट लसही बाजारात येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पण या बनावट लस बाजारात येऊ नये म्हणून १६ देशांचे गुप्तचर विभागाचे अधिकारी एकत्र काम करणार आहेत. यासाठी गुप्तचर अधिकाऱ्यांची एक संघटना स्थापन करण्यात आली आहे. युरोपीयन युनियनची संस्था युरोपोलने बनावट लसीबद्दल सावधानतेचा इशारा दिला आहे. इंटरपोलनेही गेल्या महिन्यात पर्पल नोटीस जारी केली. ही नोटीस दक्षिण अफ्रिकेत जोहानसबर्गस्थित एका गोदामात बनावट लस मिळाल्यानंतर जारी केली गेली. यानंतर जागतिक व्यासपीठ स्थापन केले गेले. एपीडीआयने नेतृत्व सांभाळताना वेगवेगळ्या देशांना या व्यासपीठात सहयोगी बनण्याचे आवाहन केले आहे.

अनेक देशांमध्ये कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. भारतात देखील लवकरच लसीकरण सुरु होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीनंतर लसीकरणाच्या तारीखेची घोषणा करु शकतात.

कोरोनामुळे संपूर्ण जग संकटात सापडलं असताना कोरोनावरील लसीबाबत आता सर्वांनाच प्रतिक्षा आहे. सध्या देशात कोरोना लसीचं ड्रायरन सुरु असून लवकरच ती सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. पण असं असताना काळा बाजार करणाऱ्यांचा डोळा देखील या लसीवर आहे. बनवाट लस बाजारात आणून विकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

कोरोनामुळे आतापर्यंत लाखो लोकांनी आपला जीव गमवला आहे. असं असतानाच यूकेमध्ये कोरोनाचा दुसरा प्रकार आढळल्यानंतर जगभरातील लोकांच्या चिंता आणखी वाढल्या आहेत.

Read More