Marathi News> विश्व
Advertisement

Breaking | भारतीयांनी तातडीने कीव सोडावं; आता काहीही होऊ शकतं, दुतावासाच्या सूचना

युक्रेनमधील भारतीय नागरिकांसाठी दुतावासाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. भारतीय विद्यार्थ्यांसह नागरिकांनी तातडीनं कीव सोडावं अशा सूचना भारतीय दुतावासाकडून देण्यात आल्या आहेत. 

 Breaking | भारतीयांनी तातडीने कीव सोडावं; आता काहीही होऊ शकतं, दुतावासाच्या सूचना

नवी दिल्ली : युक्रेनमधील भारतीय नागरिकांसाठी दुतावासाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. भारतीय विद्यार्थ्यांसह नागरिकांनी तातडीनं कीव सोडावं अशा सूचना भारतीय दुतावासाकडून देण्यात आल्या आहेत. 

युक्रेन रशिया दरम्यानचा युद्ध तीव्र स्वरूप धारण करीत आहे. रशियाने युक्रेनच्या शहरांवर मोठे हल्ले करायला सुरूवात केली आहे. एकीकडे युद्धविरामाच्या चर्चा होत असताना रशियाने उलट बॉम्ब हल्ले वाढवल्याची माहिती समोर येत आहे. 

युक्रेनची राजधानी कीव काबीज करण्यासाठी रशियाकडून सर्व शक्य प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे कीवमध्ये येत्या काळात काहीही घडू शकतं, त्यामुळे भारतीयांनी तातडीने कीव मिळेल त्या मार्गाने सोडावं असं भारतीय दुतावासाकडून सांगण्यात आले आहे.


रशियाचा युक्रेनवर व्हॅक्यूम बॉम्ब हल्ला; ओखतिर्का शहरात प्रचंड विध्वंस

रशियाने युक्रेनवर व्हॅक्यूम बॉम्ब टाकल्याचा दावा युक्रेनच्या नेत्यानं केलाय. ओखतिर्का या शहरावर हा बॉम्ब टाकल्याचा आरोप शहराच्या महापौरांनी केलाय. अणुबॉम्बच्या आधीच्या श्रेणीतला हा बॉम्ब आहे. रशियाच्या या अतिविध्वंसक बॉम्बला फादर ऑफ ऑल बॉम्ब असं म्हटलं जातं. 

व्हॅक्युम बॉम्बनंतर थेट अणुबॉम्बचीच श्रेणी सुरू होते. युद्धात व्हॅक्यूम बॉम्ब वापरण्यास बंदी आहे. तरीदेखील व्हॅक्यूम बॉम्बचा वापर केल्याचा दावा करण्यात आलाय...हा व्हॅक्यूम बॉम्ब इतका भयानक आहे, की तो फुटल्यास 300 मिटर परिसरात प्रचंड हानी होऊ शकते. या बॉम्बमुळे रेडिएशनचा जरी धोका नसला तरी मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता आहे.

Read More