Marathi News> विश्व
Advertisement

भारतीय वंशाच्या दीपा आंबेकर न्यूयॉर्कच्या न्यायाधीशपदी

भारतीय वंशाच्या दीपा आंबेकर यांनी मराठी माणसांची मान अभिमानानं उंचावली आहे.

भारतीय वंशाच्या दीपा आंबेकर न्यूयॉर्कच्या न्यायाधीशपदी

न्युयॉर्क : भारतीय वंशाच्या दीपा आंबेकर यांनी मराठी माणसांची मान अभिमानानं उंचावली आहे. त्यांची न्यूयॉर्क शहरातील दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायाधीशपदी निुयक्ती होणा-या त्या पहिल्या महाराष्ट्रीय आणि दुस-या भारतीय वंशाच्या महिला न्यायाधीश ठरल्या आहेत. आंबेकर या 41 वर्षांच्या असून त्या फौजदारी न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम पाहणार आहेत. आंबेकर यांनी न्यूयॉर्क शहर परिषदेवर तीन वर्ष वरिष्ठ पदावर काम केलं आहे. तसंच नागरी सुरक्षा समितीवर सल्लागार म्हणूनही काम केलं आहे. त्यांनी पदवीचं शिक्षण मिशिगन विद्यापीठातून पूर्ण केलं असून रुटर्स लॉ स्कूलमधून कायद्याची पदवी घेतली आहे. यापूर्वी राजा राजेश्वरी यांनी न्यूयॉर्कमध्ये न्यायाधीश म्हणून काम कोलं आहे. 

Read More