Marathi News> विश्व
Advertisement

भारतीय अब्जाधीशाचा मुलीसाठी महाल, नियुक्त केले १२ नोकर

मुलीच्या शिक्षणासाठी एका भारतीय अरबपती बापानं ब्रिटनमध्ये महाल आणि १२ नोकरांची व्यवस्था केली आहे.

भारतीय अब्जाधीशाचा मुलीसाठी महाल, नियुक्त केले १२ नोकर

लंडन : मुलीच्या शिक्षणासाठी एका भारतीय अरबपती बापानं ब्रिटनमध्ये महाल आणि १२ नोकरांची व्यवस्था केली आहे. मुलीला शिक्षण घेताना कोणतीही अडचण होऊ नये म्हणून वडिलांनी ही सोय केली आहे. या अरबपती वडिलांची मुलगी स्कॉटलंडच्या सेंट एंड्यूज युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत आहे. या अरबपती वडिल आणि मुलीच्या नावाचा खुलासा अजून झालेला नाही. नोकर नियुक्त केलेल्या एजंन्सीनंही याबद्दल माहिती द्यायला नकार दिला आहे.

'द सन' या ब्रिटनमधल्या वृत्तपत्रानं याबाबत बातमी दिली आहे. मुलीच्या पालकांनी तिच्यासाठी १२ नोकर आणि गेट उघडण्यासाठी वेगळा माणूस नियुक्त केला आहे. सिलव्हर स्वेल नावाच्या मोठ्या एजन्सीनं या मुलीसाठी नोकरांची नियुक्ती केली आहे. यामध्ये बटलर, शेफ, मेड, हाऊसकीपर, गार्डनर यांचा समावेश आहे.

नोकरांच्या नियुक्तीसाठी एक जाहिरातही देण्यात आली होती. ही मुलगी ४ वर्षांसाठी ब्रिटनमध्ये शिक्षण घेणार आहे. नियुक्त करण्यात आलेला बटलर जेवण कसं बनवलं जात आहे ते बघणार आहे. तर फूटमॅन जेवण वाढणं आणि टेबल साफ करणार आहे. एक जण महालाचं गेट उघडण्यासाठी आणि बंद करण्यासाठी ठेवण्यात आला आहे.

२८ लाख रुपये खर्च

नियुक्त केलेल्या नोकरांसाठी जवळपास ३० हजार पाऊंड म्हणजेच २८ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. 

Read More