Marathi News> विश्व
Advertisement

जोडप्यांना मुलं नकोत... चीनमध्ये अचानक लोकसंख्येत घट; जगभरात दिसणार परिणाम?

India China Population: वाढती लोकसंख्या ही जगापुढं असणारी सर्वात मोठी आणि भीषण समस्या असूनही चीनमध्ये मात्र आता वेगळ्याच अडचणीनं डोकं वर काढलं आहे.   

जोडप्यांना मुलं नकोत... चीनमध्ये अचानक लोकसंख्येत घट; जगभरात दिसणार परिणाम?

India China Population: जगातील अतिशय झपाट्यानं वाढणाऱ्या आणि मोठी अर्थव्यवस्था अशी ओळख असणाऱ्या चीनमध्ये सध्या एका वेगळ्याच समस्येनं डोकं वर काढलं आहे. सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश अशी ओळख असणाऱ्या चीनमध्ये 2023 या वर्षात सातत्यानं दुसऱ्या वर्षीची जन्मदर कमी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. एक मूल या सूत्राच्या आधारे लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी कैक दशकांपासून चीनमध्ये कठोर भूमिका घएण्यात आल्या. 

2016 मध्ये हा निर्णय रद्द करत मुलांच्या जन्मास प्राधान्य देण्यात आली पण, हा प्रयत्नही अपयशी ठरला. कारण, जेव्हा एखाद्या देशात मुलांचा जन्मदर घटण्यास सुरुवात होते तेव्हा तो पूर्वपदावर आणणं अतिशय आव्हानात्मक असतं. चीनमध्ये सद्यस्थिती पाहिल्यास एकिकडे नागरिक लग्नबंधनात अडकले असले तरीही मुलांच्या जन्मासाठी मात्र ते तयार नाहीत. 

मुलांच्या पालन- पोषणाचा आणि त्यांच्या शिक्षणाचा एकंदर खर्च पाहता आणि वाढत्या महागाईचा आलेख पाहता 2016 च्या तुलनेत चीनच्या जन्मदर मोठ्या प्रमाणात घट नोंदवण्यात आली आहे. 2023 मध्ये या देशातील लोकसंख्या  20 लाख 80 हजारांनी कमी होऊन 1.4097 अब्जांवर पोहोचली आहे. 2023 भारत सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश ठरला होता. वरील आकडेवारीच्या आधारे संयुक्त राष्ट्रांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार 2022 मध्ये लोकसंख्येत घट होणाऱ्या देशांचा आकडा 41 होता. 2050 मध्ये हाच आकडा 88 वर पोहोचू शकतो. 

हेसुद्धा पाहा : लेकीच्या लग्नात खर्च केला पाण्यासारखा पैसा; नववधूनं नेसली 17 कोटींची साडी आणि...; हा कोणाच्या लग्नाचा थाट?

चीन वाढवणार जगाची चिंता? 

जन्मदरात झालेली घट हा चीनसाठी आर्थिक आणि सामाजित आव्हानं उभी करताना दिसत आहे. कारण या देशातील सरासरी लोकसंख्या सातत्यानं वयोवृद्ध होत आहे. ज्यामुळं विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्यांचा आकडाही कमी होत आहे. काळानुरूप आणि वाढत्या वयामुळं त्यांची कार्यक्षमताही खालावताना दिसत आहे. शिवाय वाढत्या वयाच्या व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं हासुद्धा देशापुढं अडचणीचा मुद्दा आहे. ही समस्या येत्या काळात जगातील इतरही देशांना सतावू शकते ही बाब नाकारता येत नाही. 

Read More