Marathi News> विश्व
Advertisement

शेपूट गायब झाल्याचा त्रास आत्ताही भोगतोय मानव; अडीच कोटी वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

मानवी उत्क्रांती ही चमत्कारापेक्षा कमी मानली जात नाही. उत्क्रांतीसह मानवाच्या शरीरात अनेक बदल झाले. यातीलच एक बदल आहे तो मानवाची शेपटी गायब झाल्याचा. मात्र, शेपूट गायब झाल्याचा त्रास मानवाला सहन करावा लागत आहे. 

 शेपूट गायब झाल्याचा त्रास आत्ताही भोगतोय मानव; अडीच कोटी वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

Human evolution : मानवी उत्क्रांतीचा इतिहास पाहिला तर मानवी शरिरात शेकडो बदल होत गेलेत. माणसाचं शेपूट गायब झालं, मणक्याचा पोक गेला. मात्र,  शेपूट गायब झाल्याचा त्रास  मानव आत्ताही भोगत आहे. अडीच कोटी वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं? माणसाठी शेपूट कशी नामशेष झाली. याचा आता मानवावर काय परिणाम होतेय याबाबतची धक्कादायक माहिती संशोधनातून समोर आली आहे. 

गुगल वर आपण उत्क्रांती असा शब्द टाकला तर, मानाच्या उत्क्रांती साखळी दाखवणारी छायाचित्र दिसातात. यात माकडासराखा प्राणी प्राण्याच्या रुपात बदलत जाताना चित्रात दिसतो. मानव हा माकडापासून उत्पन्न झाला. यामुळे चित्रामध्ये माकडाला शेपटी दिसते. यानंतर प्रगत मानवात शेपटी दिसत नाही. 

शेपटी गायब होण्यामागे अनुवंशिक बदल

पूर्वी मानवाला देखील माकडाप्रमाणे शेपटी होती. कालांतराने मानवी शरिरात शेकडो बदल होत गेले. या बदलांबरोबर मानवाला असलेली शेपटी देखील गायब झाली. तीन लाख वर्षांपूर्वी हवामानातील बदलामुळे 'होमो सेपियन्स आफ्रिकेत विकसित झाले. होमो सेपियन्स हाच आधुनिक मानव आहे. मानवाची उत्क्रांती झाली पण, पाठीमागून शेपूट गायब झाल्याच्या मोठा परिणाम मानवाच्या आरोग्यावर झाला आहे. आजही मानवाला याचा त्रास सहन करावा लागत आहे. 

मानवाची उत्क्रांती नेमकी कधी, कशी आणि केव्हा झाली हा नेहमीच कुतूहलाचा विषय ठरला आहे. यावर अजही अनेक संशोधने केली जातात. यातून नव नविन माहिती समोर येते. मानवाच्या उत्क्रांतीचा मानवाच्या आरोग्यावर नेमका काय परिणाम झाला याबाबतही माहिती एका  संशोधन अहवालात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मानवाच्या शरीरातून शेपटी हा अवयव गायब झाल्यामुळे याचा मानवावर अनुवंशिक परिणाम झाला. यामुळे मानवामध्ये अनेक अनुवंशिक दोष निर्माण झाले. या अनुवंशिक दोषांमुळे मानवाला अनेक शारिका समस्यांचा सामना करावा लागतोय.

शेपटी गायब झाल्याचा मानवाला शारिरीक त्रास

शेपटी गायब झाल्याचा मानवाला शारिरीक त्रास भोगावा लागत आहेत. जगभरात 10% पेक्षा कमी लोक हिमोफिलियासारख्या हजारो "दुर्मिळ" अनुवांशिक आजारांनी ग्रस्त आहेत. अनेकांना सिकलसेल रोग आणि सिस्टिक फायब्रोसिस यांसारखे दुर्मिळ आजार होतात. अडीच कोटी वर्षांपूर्वी मानवाची उत्क्रांती होत असताना तो चार पायांवर न चालता थेट पाठीवर सरळ उभा राहिला यामुळे कालांतराने मानवाच्या पाठीला असलेली शेपूट गायब झाली असा सिद्धांत संशोधक मांडतात. 

 

Read More