Marathi News> विश्व
Advertisement

जगाच्या ९१ देशांमध्ये पोहोचलेला 'कोरोना' कसा निर्माण झाला?

गेल्या तीन महिन्यांपासून जगभारात कोरोना व्हायरसनं हाहाकार घातला आहे. 

जगाच्या ९१ देशांमध्ये पोहोचलेला 'कोरोना' कसा निर्माण झाला?

मुंबई : गेल्या तीन महिन्यांपासून जगभारात कोरोना व्हायरसनं हाहाकार घातला आहे. अद्यापही यावर रामबाण लस शोधण्यास यश आलेलं नाही. जगातील ९१ देशांमध्ये हा विषाणू पोहोचलाय. पण चीनच्या वुहानमधला नॅशनल बायोसेफ्टी लॅब सध्या रहस्याचं केंद्रबिंदू बनला आहे.

जानेवारी २०२०

चीनच्या वुहानमध्ये मासळी बाजारापासून ३२ किलोमीटर अंतरावरील नॅशनल बायोसेप्टी लॅबमध्ये इबोला, सार्स अशा घातक आजारांवर शोध करणाऱ्या वैज्ञानिकांचं लक्ष अशा एका विषाणूवर पडलं जो आतापर्यंत कुठेच आढळला नव्हता. पुढे वटवाघळात या विषाणूचे जीन्स सापडले. ज्या सार्सनं २००२-०३दरम्या चीनमध्ये ७०० जणांचा बळी घेतला होता. त्याविषाणूत आणि नव्यानं सापडलेल्या विषाणूत वैज्ञानिकांना थोडं साधर्म्य आढळून आलं. आणि नव्या विषाणूनं जगापुढे मोठं संकट निर्माण झालंय याचा अंदाज चीनला सर्वात प्रथम लागला.

डिसेंबर २०१९

चीनमधील सातव्या क्रमांकाचं सर्वात मोठं शहर वुहानच्या मच्छीमार्केटजवळील लोकं अचानक आजारी पडू लागले. या रुग्णाचे नमुने जेव्हा व्हायरॉलॉजी नॅशनल बायोसेप्टी लॅबमध्ये पोहोचले तेव्हा जगावर किती मोठं संकट ओढावलंय याची जाणीव शास्त्रज्ञांना झाली.

वुहानच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार डिसेंबरमध्ये कोरोनाचं संक्रमण सुरु झालं. कोरोना जगावरील सर्वात मोठं संकट ठरेल असा इशाराही शास्त्रज्ञांनी दिला. मात्र स्थानिक कम्युनिस्ट पक्षानं ही माहिती लवपल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर चीननं WHOला या नव्या विषाणूबाबत माहिती दिली. मात्र चीननं या आजाराला न्युमोनिया असंच म्हटलं.

१२ ते २९ डिसेंबर दरम्यान या विषाणूच्या संक्रमणाचे नमुने समोर आले. १ जानेवारी २०२०ला चीनच्या आरोग्य विभागानं वूहान येथील मच्छी मार्केट बंद केला. ५ जानेवारीला चीनी सरकारनं जाहीर केलं की हा न्युमोनीया सार्स किंवा मर्स नसून वेगळाच आजार आहे.

७ जानेवारीला या WHOनं या नव्या व्हायरसला 2019-nCoV असं नाव दिलं. सुरुवातीला चीननं या आजाराला गांभीर्यानं घेतलंच नाही. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार १० ते १४ दिवस हा विषाणू सुप्तावस्तेत असतो. त्यामुळे रुग्णाला त्याच्या संक्रमणाची जाणीव होत नाही.. त्यामुळे रोगाचा प्रसार झपाट्यानं होतोय.

Read More