Marathi News> विश्व
Advertisement

PHOTO : खास डूडल साकारत गुगलने जागवल्या 'क्रॉकोडाईल हंटर', स्टीव्ह आयर्विनच्या आठवणी

उल्लेख झाला की एक चेहरा नेहमीच समोर येतो.

PHOTO : खास डूडल साकारत गुगलने जागवल्या 'क्रॉकोडाईल हंटर', स्टीव्ह आयर्विनच्या आठवणी

मुंबई : प्राणीमात्रांविषयी अधिक माहिती देणाऱ्या कार्यक्रमांचा उल्लेख झाला की एक चेहरा नेहमीच समोर येतो. खाकी रंगाचे कपडे घालून मगर, सूसर अशा प्राण्यांसोबत जणू काही ते आपले मित्रच आहेत इतक्या सहजतेने वावरणाऱ्या त्या चेहऱ्याचं नाव आहे स्टीव्ह आयर्विन. आज अचानक स्टीव्ह आयर्विन याची आठवण होण्याचं कारण म्हणजे गुगलने साकारलेलं भन्नाट डूडल. 

प्रसिद्ध आणि विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या काही व्यक्तींच्या आठवणी जागवत आणि त्यांच्या कार्याला सलाम करत गुगलने नेहमीच डूडलच्या माध्यमातून त्यांना सलाम केला आहे. आज, २२ फेब्रुवारीलाही स्टीव्ह आयर्विन या ऑस्ट्रेलियन वन्यजीवप्रेमी आणि वन्यजीव अभ्यासकाच्या जन्मदिवसानिमित्ताने डूडलच्या माध्यमातून त्याच्या कारकिर्दीचा धावता आढावा घेण्यात आला आहे. 

fallbacks

स्टीव्ह आज आपल्यात नसला तरीही त्याचा वन्यजीवांसोबतचा वावर आणि एकंदर गोष्टी, अगदी सहजपणे प्रेक्षकांना समजतील अशा अंदाजात मांडण्याची शैली आजही तितकी लोकप्रिय आहे. 'क्रॉकोडाईल हंटर' या सीरिजमुळे तो जास्तच प्रकाशझोतात आला होता. स्टीव्हने त्याची पत्नी आणि मुलांसोबतही काही कार्यक्रम केले. ज्या माध्यमातून त्याने असंख्य प्रेक्षकांची मनं जिंकली. 

४ सप्टेंबर २००६ मध्ये अंडरवॉटर डॉक्युमेंट्रीचं चित्रीकरण करत असताना स्टींग रे माशाच्या दंशामुळे त्याचं निधन झालं. त्यावेळी त्याचं वय अवघे ४४ वर्षे होतं. आज स्टीव्ह हयात असता तर तो ५७ वर्षांचा असता आणि असाच वन्यजीवांविषयी नवनवीन माहिती सर्वांपर्यंत पोहोचवत राहिला असता. स्टीव्हच्या जयंतीनिमित्त ऑस्ट्रेलियामध्ये २२ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय वन्यजीव दिवस म्हणून साजरा केला जातो.

वन्यजीव अभ्यासकासोबतच त्याची आणखी एक ओळखही आहे. ती म्हणजे ऑस्ट्रेलिया प्राणीसंग्रहालयाचा मालक. स्टीव्हच्या पालकांनी या प्राणीसंग्रहालयाची सुरुवात केली होती. पालकांसोबत प्राणीसंग्रहालयाचं काम पाहता पाहता पुढे जाऊन त्याने हा सर्व कार्भार सांभाळला होता. याच प्राणीसंग्रहालयात त्याची त्याच्या पत्नीशी पहिली भेट झाली होती. स्टीव्ह आणि त्याचं कुटुंब नेहमीच जगभरातील प्राणीप्रेमी, वन्यजीव अभ्यासक यांच्यासाठी खास ठरलं आहे. एक प्रकारचं अदृश्य नातंच या साऱ्यांमध्ये आकारास आलं होतं असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 

 

Read More