Marathi News> विश्व
Advertisement

कोरोना उद्रेकांदरम्यान चांगली बातमी, हा स्प्रे 99.99 % विषाणू करतो नष्ट

कोरोनाव्हायरस (Coronavirus) विरुद्ध लढण्यासाठी नाकाद्वारे घेण्यात येणारा नेजल स्प्रे (Nasal Spray) एकदम प्रभावी ठरु शकतो.  

कोरोना उद्रेकांदरम्यान चांगली बातमी,  हा  स्प्रे 99.99 % विषाणू करतो नष्ट

टोरोंटो : कोरोनाव्हायरस (Coronavirus) विरुद्ध लढण्यासाठी नाकाद्वारे घेण्यात येणारा नेजल स्प्रे (Nasal Spray) एकदम प्रभावी ठरु शकतो. कॅनेडियन (Canada) कंपनी सॅनोटाईझने (SaNOtize)याबाबत तसा दावा केला आहे. नाकाद्वारे स्प्रे दिला जातो, ज्यामुळे कोरोना विषाणूचे 99.99 टक्के नष्ट होण्यास मदत होते. कंपनीचे म्हणणे आहे की, नाकाद्वारे घेण्यात येणाऱ्या स्प्रेमुळे केवळ संसर्ग रोखता येणार नाही तर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण त्वरीत बरे होतील आणि लक्षणे तीव्र होण्यापासून प्रतिबंध होईल, असा कंपनीकडून दावा करण्यात आला आहे.

चाचणीमध्ये चांगले परिणाम  

'द सन' या वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, सॅनोटाइझ (SaNOtize) कंपनीने म्हटले आहे, अमेरिका (US) आणि यूकेमधील  (UK) चाचण्यांच्या निकालांवरून असे दिसून आले की  नेजल स्प्रेने हवेतील कोरोनाव्हायरस नष्ट करण्यास सुरुवात केली आणि नाकाद्वारे हा स्प्रे घेतल्यानंतर कोरोना विषाणू फुफ्फुसांपर्यंत पोहोचण्यापासून प्रतिबंधित करतो. कंपनीचा असा दावा आहे की पहिल्या 24 तासांत स्प्रे चाचणी दरम्यान ज्यांनी त्याचा वापर केला त्यांच्या शरीरातून व्हायरलमध्ये 1.362 घट झाली आहे. म्हणजेच, एका दिवसात व्हायरसची संख्या 95 टक्क्यांनी घटली, जी पुढच्या 72 तासांत 99 टक्क्यांपर्यंत वाढली. म्हणजे या स्प्रेचा प्रभाव चांगला दिसून येत आहे.

'‘Revolutionary असल्याचे सिद्ध होईल'

यूकेमधील चाचण्यांचे Chief Investigator डॉ. स्टीफन विंचेस्टर  (Dr Stephen Winchester) म्हणाले की, कोरोना साथीच्या विरुद्ध सुरु असलेल्या जागतिक लढाईतील हे नेजल स्प्रे  सर्वात मोठे शस्त्र असल्याचे सिद्ध होईल. ते म्हणाले, 'सोप्या भाषेत सांगायचे तर हा स्प्रे क्रांतिकारक ठरेल'. महत्त्वाचे म्हणजे नाकाद्वारे वापरल्या जाणाऱ्या औषधांविषयी जगातील कोरोनाविरूद्ध वेगाने संशोधन चालू आहे. इतर अनेक औषध कंपन्यांनीही चाचण्या सुरु केल्या आहेत. अशा परिस्थितीत स्वच्छतेचा दावा दिलासा देणार आहे

कोरोनाचा वेग वाढत आहे

सध्या जगातील अनेक देशात कोरोनाचा उद्रेक दिसून येत आहे. यावेळी कोरोना पूर्वीपेक्षा अधिक धोकादायक असल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी, कोरोना विषाणूमुळे सात दिवसांमध्ये फुफ्फुसांना नुकसान झाले होते, आता ते फक्त दोन ते तीन दिवसांत होत आहे. त्यामुळे मृत्यूची संख्याही वाढत आहे. संसर्ग रोखण्यासाठी सर्व राज्ये आपापल्या स्तरावर पावले उचलत आहेत. आता वाढत्या घटनांमध्ये महाराष्ट्रात 15 दिवसांचा लॉकडाउन सारखा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्फ्यू जाहीर करुन सांगितले की कोरोना विषाणूविरूद्ध पुन्हा एकदा युद्ध सुरू झाले आहे. 

Read More