Marathi News> विश्व
Advertisement

सोन्याचे एटीएम कार्ड, यावर तुमचे नाव आणि सही असणार!

तुम्ही कधी सोन्याचे एटीएम कार्ड पाहिले आहे का?, असे एटीएम कार्ड आता तुम्हाला वापरता येईल. 

सोन्याचे एटीएम कार्ड, यावर तुमचे नाव आणि सही असणार!

लंडन : तुम्ही कधी सोन्याचे एटीएम कार्ड पाहिले आहे का?, असे एटीएम कार्ड आता तुम्हाला वापरता येईल. ब्रिटनमधल्या एका कंपनीने हे एटीएम कार्ड तयार केले आहे. ते १८ कॅरेट सोन्याचे आहे. त्यावर हॉलमार्कची निशाणी आहे. त्यासाठी तुम्हाला चुकवावे लागतील १४ लाख ७० हजार रुपये. यावर तुमचे नाव आणि स्वाक्षरी असणार आहे. यासाठी तुम्हाला ट्रॅन्झॅक्शन फी लागणार नाही. कार्ड चोरीला गेल्यास नवे मिळू शकते. सध्या जगभरात फक्त ५० लोकांनाच हे कार्ड दिले जाणार आहे.

१८ कॅरेट सोन्यापासून हे पहिलेच हॉलमार्कचे कार्ड असणार आहे. ब्रिटनमधील रॉयल मिंटने हे कार्ड तयार केले आहे. ही रॉयल मिंट कंपनी एटीएम कार्ड तयार करते. हे कार्ड खरेदी केल्यानंतर ग्राहक मास्टर कार्डसोबत आपोआप रारिस खातेधारक होणार आहे. 

fallbacks

Pic Courtesy : CNN Business

रॉयल मिट १,१०० वर्षांपासून इंग्लंडमध्ये नाणी तयार करण्याचे काम करत आहे. आता या कंपनीने डिजिटल व्यवहारासाठी मास्टरकार्ड आणि एकोम्पीश फायनांशिअलबरोबर हे कार्ड तयार केले आहे. ही कार्ड सुरुवातीला ५० लोकांना देण्यात येणार आहे. त्यासाठी नव्या डिझाइनची घोषणा करण्यात येणार आहे. ही योजना सुरु करण्यासाठी किमान एक वर्ष लागेल, अशी माहिती मास्टरकार्डचे प्रवक्ता जेम्स थोरपे यानी सीएनएनला दिली.

Read More