Marathi News> विश्व
Advertisement

साथींची लाट येणार? कारण ठरणार लाखो वर्षांपूर्वीचे आर्टिकच्या बर्फात गोठलेले विषाणू; जगावर टांगती तलवार

World News : मानवजातीच्या एका चुकीमुळं होणार मोठी हानी... आता यातून बचाव कसा करायचा? पाहा विज्ञानही या परिस्थितीपुढे हात का टेकतंय...   

साथींची लाट येणार? कारण ठरणार लाखो वर्षांपूर्वीचे आर्टिकच्या बर्फात गोठलेले विषाणू; जगावर टांगती तलवार

World News : पृथ्वीवर कैक वर्षांपूर्वी जीवसृष्टी अस्तित्वात आली. बहुविझ जीवतंजू, त्यांच्या असंख्य प्रजाती जन्माला आल्या. त्यातील काहींचा ऱ्हास झाला, तर काहींमध्ये काळानुरूप काही जनुकीय बदल झाले आणि त्यांची तितकीच बहुविध रुपं उदयास आली. जीवाणू, विषाणू हासुद्धा त्याचाच एक भाग. तुम्हीआम्ही या विश्वातील अगदी नगण्य घटत आहोत. मुळात आपल्या अस्त्विताच्या बरंच अधीपासून अस्तित्वं होतं ते म्हणजे सूक्ष्मजीवांचं.

तुम्हाला माहितीये या पृथ्वीवर आजही असे काही विषाणू अस्तित्वात आहेत ज्यांचा संसर्ग थांबवणं जवळपास अशक्य. बरीच वर्षे मागे डोकावून पाहिलं, तर डायनासोरच्या कालखंडानंतर पृथ्वीवर हिमयुग आलं आणि त्यातच हे जीवघेणे विषाणू बर्फाखाली गोठले. आर्क्टिक महासागर आणि नजीकच्या भागात आजही हे विषाणू बर्फाखाली आहेत. पण, सध्याची जागतिक तापमानवाढ पाहता जसजसं समुद्राच्या पाण्याचं तापमान वाढेल, मोठमोठाले हिमनग वितळू लागतील तसतसं या बर्फाचं पाणी होऊन या पाण्यावाटे हे विषाणू पुनरुज्जीवित होतील. विविध मार्गांनी हे विषाणू मानवाच्या संपर्कात येऊन अनेक साथींचा प्रादुर्भाव वाढून हाहाकारही माजेल अशी भीती निर्माण होत आहे. 

नासाही परिस्थितीवर नजर ठेवून 

आर्क्टिकमधील पर्माफ्रॉस्ट वितळल्यामुळं पृथ्वीवर होणाऱ्या परिणामांविषयी मागील काही वर्षांमध्ये अनेक संशोधनं झाली. यात नासाचंही योगदान पाहायला मिळालं. ज्यामध्ये पर्माफ्रॉस्ट अचानकच वितळू लागल्यामुळं त्यातून कार्बनचं उत्सर्जन होत असून, लाखो वर्षांपासून निपचित पडलेले विषाणू सक्री होतील असं निरीक्षण समोर आलं होतं. त्यामुळं जागतिक तापमानवाढ वेळीच आटोक्यात आली नाही, तर हे संकट आणखी गंभीर रुप घेऊन मानवजातीला धोका निर्माण होईल ही शक्यता नाकारता येत नाही. 

हेसुद्धा वाचा : बापरे... पृथ्वीवरील या 10 ठिकाणांवर मानवाचं अस्तित्वच नाही; यादी फारच रंजक

सर्वात मोठी बाब म्हणजे अद्यापही विज्ञान इतकंही पुढे गेलेलं नाही, की या विषाणूंशी लढा देणं सहज शक्य असेल. त्यामुळं ही गंभीर बाब ठरत आहे. संशोधकांच्या दाव्यानुसार आर्क्टिकच्या पर्माफ्रॉस्टमध्ये अनेक जीवघेणे विषाणू आहेत. हा दावा अधिक प्रबळ ठरत आहे, कारण 2015 मध्ये बरेच झॉम्बी व्हायरस पुन्हा सक्रीय झाले होते. पीएलओएस कम्प्यूटेशनल बायोलॉजी जर्नल प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका निरीक्षणामध्ये प्राचीन विषाणू आणि बॅक्टेरिया यांच्या एकत्रिकरणातून त्यांच्या परिणामांना डिजिटल स्वरुपात तयार करण्यात आलं होतं. ज्यामधून लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीवर अस्तित्वं नष्ट झालेल्या या विषाणूंच्या पुनरुज्जीवनासाठी पूरक परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. 

Read More