Marathi News> विश्व
Advertisement

ॲमेझॉनच्या जंगलात राहणाऱ्यांना लागला अश्लील व्हिडीओंचा नाद? अखेर सत्य उघड

Amazon Tribe Using Internet : Amazon च्या घनदाट जंगलात जमातीला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी मोफत इंटरनेट देण्यात आलं. त्यानंतर दैनंदिन जीवनातील काम सोडून इथल्या लोकांना सोशल मीडिया आणि अश्लील व्हिडीओचा नाद अशा मथळ्याचा बातम्या काही दिवसांपूर्वी व्हायरल झाल्या होत्या. अखेर यामागील सत्य समोर आलंय.     

ॲमेझॉनच्या जंगलात राहणाऱ्यांना लागला अश्लील व्हिडीओंचा नाद? अखेर सत्य उघड

Amazon Tribe Using Internet : जगाच्या पाठीवर अशा अनेक जमाती आहेत, ज्या अजूनही मुख्य प्रवाहापासून कोसो दूर आहेत. हा जमाती जगाच्या नजरेपासून ते स्वतःला लपवून ठेवतात. यापैकी काही जमातींचे लोक अतिशय धोकादायक असतात. काही जमातीमध्ये तर बाहेरील लोकांना हस्तक्षेप करु देत नाहीत. पण या जमातींना मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा प्रयत्न मोठमोठ्या एनजीओपासून ते देशाच्या सरकारकडून करण्यात येतोय. काही जमातीने मुख्य प्रवास येण्यास नकार दिला आहे. ते आपली संस्कृती आणि रीतिरिवाजला धोका आहे, असं मानतात. या जमातांना जीवनावश्यक वस्तू पुरवल्या जातात. जेणे करुन त्यांचं आयुष्य थोड तरी सुसह्य व्हावं. पण यातील एक जमात आहे ज्यांनी मुख्य प्रवाहात येण्यासाठी पुढाकार घेतला. अमेझॉनच्या जंगलात राहणारी मारुबो ट्राइब्स. त्यांचे जीवन सुसह्य आणि आधुनिक व्हावे म्हणून इलॉन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीने त्यांना मोफत इंटरनेट उपलब्ध करुन दिलं. पण यानंतर या जमातील लोकांनी अश्लिल व्हिडीओचा नाद लागल्या अशा आशयचा बातम्या व्हायरल झाल्या होत्या. 

इलॉन मस्कने त्यांना स्टारलिंक उपग्रहांद्वारे इंटरनेट सुविधा उपलब्ध करुन दिलं खरं पण या लोकांना सोशल मीडियाचं वेड लागलंय. शिवाय ते दैनंदिन जीवनातील काम सोडून अश्लिल व्हिडीओ पाहत बसतात. या लोकांना सोशल मीडिया आणि अश्लिल व्हिडीओचं व्यसन लागलंय. एवढंच नाही तर ब्राझीलमधील इटुई नदीच्या काठावर विखुरलेल्या वस्त्यांमध्ये राहणारे मारुबो आदिवासींचे स्थानिक लोकही ऑनलाइन फसवणुकीचे बळी ठरत आहेत, असं या बातम्यांमध्ये सांगण्यात आलंय होतं. 

न्यूयॉर्क टाइम्सने सर्वप्रथम ही बातमी दिल्यानंतर इतर ठिकाणी या बातम्या आल्यात. मात्र यात काही तथ्य नाही, हे समोर आलंय. इथल्या लोकांना इंटरनेटची सेवा मिळाल्यानंतर त्यांना अशा कुठलही व्यसन लागलेल नाही. 

fallbacks

ब्राझीलमध्ये स्टारलिंक सेवा 2022 मध्ये सुरू करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी ॲमेझॉनच्या जंगलात राहणाऱ्या या आदिवासी लोकांना लक्ष केलं. न्यूयॉर्क टाइम्सच्या टीमने अनेक तरुण इंस्टाग्रामवर स्क्रोल करताना दिसतात, असा अहवाल दिला आहे. न्यूयॉर्क टाइम्सचा 40 वर्षीय एनोके मारुबो यांनी सांगितलं की, एक व्यक्ती त्याच्या मैत्रिणीसोबत मेसेजवर बोलताना पाहिला मिळाला. तर दुसरीकडे एका ठिकाणी लोकांचा जमाव फुटबॉल सामन्याचा आनंद लुटत होता. हे चित्र पाहून तुम्ही विचारही करु शकणार नाही ही लोक ॲमेझॉनच्या जंगलात राहणारी आहेत. इथल्या काही लोकांनी इंटरनेटच्या वापरचा बहिष्कार केला आहे. या इंटनेटमुळे त्यांच्या आयुष्य जगणे अवघड झालाय. असं त्यांनी अहवालात सांगितलं होतं. 

 

Read More