Marathi News> विश्व
Advertisement

पत्नीसह ३ मुलांना कारमध्ये जिवंत जाळत माजी खेळाडूची आत्महत्या

पत्नीसह ३ मुलांचा दुर्दैवी अंत

पत्नीसह ३ मुलांना कारमध्ये जिवंत जाळत माजी खेळाडूची आत्महत्या

ब्रिसबेन : बुधवार एक अशी घटना घडली ज्यामुळे अनेकांना धक्का बसला. रग्बी खेळाडू रोवन बेक्सटर (Rovan Baxter) ने त्याची पत्नी आणि ३ मुलांना कारमध्ये बंद करत जिवंत जाळलं. त्यानंतर त्याने ही आत्महत्या केली. ब्रिसबेनच्या कँप हिल भागात ही घटना घडली. सकाळी 8.30 वाजता मोठा आवाज झाला. त्यानंतर अचानक आरडाओरड सुरु झाला. लोकं जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांनी पाहिलं की, रोवनची पत्नी हैना (Hannah Baxter), त्याची तिन्ही मुलं, ज्यामध्ये सहा वर्षाची लायना, चार वर्षाची अलिया आणि तीन वर्षाचा ट्रे कारमध्ये फसले आहेत आणि कारला आग लागली आहे. कारच्या समोर रोवन (Rovan Baxter) देखील पडला होता. त्याने स्वत:वर चाकूने वार केले होते. लोकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलं. पण त्यांचा मृत्यू झाला.

कारमधून बाहेर काढल्यानंतर हैना बोलत होती की, त्याने माझ्य़ावर पेट्रोल टाकलं. हैना ही ड्राईव्हींग सीटवर बसली होती. तर रोवन हा देखील कारमध्ये पुढे बसला होता. दोघांमध्ये काही तरी वाद झाल्याचं देखील समोर येत आहे. 

fallbacks

रोवन हा माजी रग्बी खेळाडू होता. ते मागच्या वर्षी वेगळे झाले होते. मुलांच्या कस्टडीवरुन त्यांच्यात वाद सुरु होते. पण या वादामुळे संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला. रोवन एनबीएलमध्ये न्यूझीलंडकडून खेळायचा. 

Read More