Marathi News> विश्व
Advertisement

कोरोनाच्या पाचव्या लाटेची चाहूल! म्हणतात, त्सुनामीहूनपेक्षाही अधिक खतरनाक असू शकतो संसर्ग

कोरोना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. नुकतेच फ्रांसमधून कोरोना विषाणूच्या पाचव्या लाटेच्या बातम्या येत आहेत.

कोरोनाच्या पाचव्या लाटेची चाहूल! म्हणतात, त्सुनामीहूनपेक्षाही अधिक खतरनाक असू शकतो संसर्ग

पॅरिस : संपूर्ण जगात कोरोनामुळे अनेकांनी आपले नातलग आणि मित्रांना गमावले आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाच्या गतीला नियंत्रणात ठेवण्यासाठी लसीकरणसुद्धा वाढवण्यात आले आहे. परंतु संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. नुकतेच फ्रांसमधून कोरोना विषाणूच्या पाचव्या लाटेच्या बातम्या येत आहेत. फ्रांसचे आरोग्यमंत्री यांनी म्हटले की, देशात कोरोना महामारीच्या पाचव्या लाटेची सुरूवात झाली आहे. त्यांनी म्हटले की, आमच्या बाजूच्या देशामध्ये पाचवी लाट आली आहे. 

आधीपेक्षा जास्त धोका
फ्रांसचे आरोग्यमंत्री ओलिविअर वेरन (Olivier Véran)यांनी फ्रांसच्या स्थानिक माध्यमांशी बोलताना म्हटले की, देशात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेची सुरूवात झाली आहे. वेरन पुढे म्हटले की, पाचवी लाट आधीपेक्षा खूप जास्त खतरनाक ठरू शकते. पाचव्या लाटेपासून वाचायचा, एकमात्र उपाय म्हणजेच कोरोना प्रोटोकॉलचे पालन करणे होय.  आमच्या बाजूच्या देशांमध्ये पाचवी लाट आधीच आली आहे. ही लाट आधीच्या कोरोना लाटेपेक्षा गंभीर असू शकते.

ऑक्टोबरपासून वाढत आहेत रुग्ण
देशात कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये ऑक्टोबरपासून वाढ होत आहे. ओलिविअर यांच्या मते देशातील नागरिक लसीकरण, मास्क आणि स्वस्छतेच्या उपयोजनांसह पाचव्या लाटेशी दोन हात करतील. आम्हाला आशा आहे की, संसर्गाच्या या लाटेला आम्ही पूर्णतः हरवू. फ्रांसमध्ये आतापर्यंत कोरोना संसर्गामुळे 73.46 लाखाहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनामुळे फ्रांसमध्ये 1.19 लाखाहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका
भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जबरदस्त फटका बसला होता. सुरूवातील हा विषाणू  ब्रिटेन, फ्रांस, बेल्जियम, इटली, नेदरलॅंड, स्पेन आणि स्विडनमध्ये पसरला होता. अमेरिकेतदेखील मागील वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने लाखो लोकांचा जीव घेतला होता.

Read More