Marathi News> विश्व
Advertisement

Trending Video: हत्तींचा 'हा' क्यूट व्हिडीओ पाहून तुमच्या ही चेहऱ्यावर स्मित हास्य येईल

Viral Animal Video: छोटे छोटे बेबी हत्ती (Baby elephant) तर जाम क्यूट दिसतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.  

Trending Video: हत्तींचा 'हा' क्यूट व्हिडीओ पाहून तुमच्या ही चेहऱ्यावर स्मित हास्य येईल

Elephant Video: सोशल मीडिया (social media) हा अनेक प्राण्यांचा व्हिडीओंचा (Video) खजिना आहे. यावर वेगवेगळे प्राण्यांचे व्हिडीओ (Animal Video) पाहिला मिळतात. हत्ती हा विशाल असा प्राणी अनेकांना आवडतो. बॉलिवूडमधील (Bollywood) अनेक चित्रपटात हत्तीची भूमिका दाखवण्यात आली आहे. छोटे छोटे बेबी हत्ती (Baby elephant) तर जाम क्यूट दिसतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 

हाथी मेरे साथ!

या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता, जंगलात एक बेबी हत्ती बसला आहे. थोड्याच वेळात तिथे अजून एक छोटा हत्ती येतो आणि त्याची सोंड ओढायला लागतो. या दोघांची लढाई पाहून अजून एक छोटा हत्ती त्यामध्ये सहभागी होती. (elephant enjoys playtime Trending Video on social media nmp)

थकवा दूर करणारा व्हिडीओ

शेल्ड्रिक वाइल्डलाइफ ट्रस्टने तीन दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर (Instagram) हा सुंदर व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यांनी व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे की, "रोहो हा नर्सरीचा मुकुट असलेला राजा आहे! (खरेतर, तो कळपातील सर्वात जुना बैल आहे, परंतु आम्हाला त्याच्या राजेशाही स्थितीत थोडासा वैभव आणि परिस्थिती जोडायला आवडते.), तो फक्त तिच्या राज्यात बसतो आणि तिच्या गणिका तिच्याबरोबर खेळायला येण्याची वाट पाहतो." 

Read More