Marathi News> विश्व
Advertisement

Crime News : धक्कादायक! महिला शिक्षिकेने 300 वेळा विद्यार्थ्यासोबत ठेवले शारीरिक संबंध

Crime News : एका धक्कादायक कृत्याने सर्वांना हादरुन सोडलं आहे. एका महिला शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत 300 वेळा शारीरिक संबंध ठेवले. शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या या घटनेने वासनेचे धक्कादायक चेहरा समोर आला आहे. 

Crime News : धक्कादायक! महिला शिक्षिकेने 300 वेळा विद्यार्थ्यासोबत ठेवले शारीरिक संबंध

Crime News : गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः॥ गुरु शिष्यचं नातं हे जगातील सर्वात पवित्र नातं मानलं जातं. गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाच्या, प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जाणारी वंदनीय व्यक्ती...पण या शिक्षकी पेशाला काळीमा फासणार धक्कादायक कृत्य समोर आला. गुरु हे पालकांच्या जागी असतात. पण शिक्षिकेच्या या धक्कादायक कृत्य ऐकून तळ मस्तकातील आग डोक्यात जाते. 

अन् तिने 300 वेळा विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले

द मिररनुसार, शिक्षिकेच्या मुलीच्या एक्स बॉयफ्रेंड जो तिचा विद्यार्थी होता. या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. या मैत्रीचा फायदा घेत 45 वर्षीय महिला शिक्षिकेने 16 वर्षीय विद्यार्थ्यासोबत अश्लिल चाळे करण्यास सुरुवात केली. या शिक्षिकेने तब्बल 5 वर्ष त्या मुलाचं लैंगिक शोषण केलं. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या शिक्षिकेने साधारण 300 वेळा या विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले होते. ती त्याला शाळेतून बाहेर घेऊन जात होती आणि त्यावर लैंगिक अत्याचार करत होती. त्याला मुलाला तिने धाकाखाली ठेवले होते. 

कुठलं आहे हे प्रकरण?

ही धक्कादायक आणि संतापजनक घटना अमेरिकेच्या ओल्हाहोमामधील आहे. त्या महिला शिक्षिकेला अटक करण्यात आली असून तिच्यावर रेप, शोषण आणि अत्याचारसारखे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत.  कोर्टात तिच्याबद्दल खटला सुरु आहे. ही घटना 2017 मधील आहे. 

या महिलेने पहिल्यांदा पीडित विद्यार्थ्याला  2017 मधील शारीरिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती केली होती. त्यानंतर सलग 2022 पर्यंत ती त्याचावर अत्याचार करत होती. या महिला शिक्षिकेचं नाव जेनिफर आहे. तिच्या या भयानक कृत्याबद्दल कळल्यानंतर शाळेने तिला कामावरुन काढून टाकलं. 

मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत महिलेचं हे कृत्य ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. आज पीडित मुलगा 21 वर्षांचा झाला आहे. सध्या हे प्रकरण कोर्टा सुरु असून याचा निकाल येणं बाकी आहे. 

Read More