Marathi News> विश्व
Advertisement

Covid-19 पॉझिटीव्ह महिलेने दिला बाळाला जन्म, जाणून घ्या

कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या महिलेने एंटीबॉडीसहीत बाळाला जन्म दिलाय.

Covid-19 पॉझिटीव्ह महिलेने दिला बाळाला जन्म, जाणून घ्या

सिंगापूर : कोरोना वायरस (Coronavirus)चा प्रादुर्भाव दिलसेंदिवस वाढताना दिसतोय. कोरोना पॉझिटीव्ह प्रेग्नेंट महिलेच्या होणाऱ्या बाळास कोरोना होण्याचा धोका असतो. दरम्यान सिंगापूरमध्ये कोरोनासंदर्भातील एक वेगळं प्रकरण समोर आलंय. यामध्ये कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या महिलेने एंटीबॉडीसहीत बाळाला जन्म दिलाय.

कोरोनामुक्त बाळाचा जन्म 

स्ट्रेट टाईमच्या रिपोर्टनुसार सेलीन एनजी-चान नावाची महिला मार्चमध्ये कोरोना पॉझिटीव्ह झाली होती. आता तिने एल्ड्रिनला जन्म दिलाय. एल्ड्रीनही कोरोनामुक्त जन्माला आलीय. तसेच तिच्याकडे एंटीबॉडीज देखील सापडल्या आहेत.

डॉक्टरांना होता विश्वास 

माझ्या गर्भधारणेवेळी माझ्या मुलामध्ये देखील एंटी बॉडी तयार होऊ शकतील असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला होता असे महिलेने सांगितले. बाळाला कोरोना होईल याबद्दल मला भीती नव्हती कारण ट्रान्समिशन रिस्क (आईकडून बाळाकडे) खूप कमी असते हे  मला माहित होतं असं सेलीन म्हणाली.

३.५ किलो वजन 

सेलीन म्हणते, एल्ड्रीन आयुष्यात आल्याने मी खूप आनंदीत आहे आणि ती खूप सुदृढ आहे. मला वाटलेलं की माझा कोरोनाचा प्रवास आता संपलाय. पण ७ नोव्हेंबर नॅशनल यूनिव्हर्सिटी हॉस्पिटल (NUH)एल्ड्रीनचा जन्म झाला आणि तिचे वजन ३.५ किलो आहे. 

सिंगापूरमध्ये आतापर्यंत ५८ हजार २१३ जणांना कोरोना प्रादुर्भाव झालाय. यामध्ये ५८ हजार १२४ जण बरे झाले आहेत. सिंगापूरमध्ये कोविड १९ (Covid-19) मुळे २९ जणांचा मृत्यू झालाय. देशामध्ये ६० कोरोना एक्टीव्ह केस आहेत. 

Read More