Marathi News> विश्व
Advertisement

पावसाळ्यात कोरोनाचा विषाणू मरणार की वाढणार? पाहा तज्ज्ञांचं मत

पावसाळ्यात कोरोनाचा नाश होणार का?

पावसाळ्यात कोरोनाचा विषाणू मरणार की वाढणार? पाहा तज्ज्ञांचं मत

मुंबई : मान्सून भारतात दाखल झाला आहे. हवामान खात्यानेही याची माहिती दिली आहे. पण आता कोरोना विषाणूवर पावसाचा काय परिणाम होतो हे पाहावं लागेल. 2020 चा पाऊस हा कोरोना व्हायरसला सोबत घेऊन जाईल की कोरोना विषाणूला आणखी वाढवेल हे पाहावं लागेल. कोरोना विषाणूवरील पावसाच्या परिणामाबद्दल जगभरातील शास्त्रज्ञ काय म्हणतात पाहूया.

डेलावेअर विद्यापीठाच्या संसर्गजन्य रोग विभागातील शास्त्रज्ञ जेनिफर होर्ने यांनी म्हटले आहे की, पावसाचे पाणी व्हायरस नष्ट करु शकत नाही. यामुळे व्हायरसचा प्रसार कमी होईल असं म्हणता येणार नाही. नुसते हात पाण्याने धुतले तर विषाणू मरणार नाही, साबण लावावाच लागेल.

अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातील अप्लाइड फिजिक्सचे शास्त्रज्ञ जेर्ड इवांस म्हणतात की, 'पावसात कोरोना विषाणूचा काय परिणाम होईल हे अद्याप कळलेले नाही. तथापि, बहुतेक शास्त्रज्ञांचा असान अंदाज आहे की, पावसाच्या ओलाव्यामुळे व्हायरस आणखी पसरु शकतो.'

पावसामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका वाढेल. वॉशिंग्टन विद्यापीठातील जागतिक आरोग्य, औषध आणि साथीच्या रोगांचे प्राध्यापक जेई बेटेन म्हणतात की, पावसाच्या पाण्यात कोरोनाचा व्हायरस वाहून जावू शकतो. जसं धुळीचे कण पावसात वाहून जातात.

बर्‍याच तज्ञांचे मत आहे की, साबणासारखे निर्जंतुकीकरण करण्यास पाऊस सक्षम नाही. आपण आपले हात पाण्याने धुऊन घेतल्यास व्हायरस मरणार नाही, त्यासाठी आपल्याल हात साबणाने धुवावे लागतील.

मेरीलँड युनिव्हर्सिटीच्या माहितीनुसार, कोरोनाचे विषाणू १७ दिवसानंतर ही आढळून आले आहेत. त्यामुळे पावसामुळे कोरोनाचे विषाणू धुवून निघतील असं म्हणणं चुकीचं ठरेल.

जगभरातील तज्ञ लोकांना पावसाळ्यात कोरोनाबाबत आणखी खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहेत. कारण आर्द्रतेमुळे कोरोनाव्हायरस बरेच दिवस हवेत तरंगू शकतो. यामुळे वेगाने संक्रमणाचा धोका वाढू शकतो.

Read More