Marathi News> विश्व
Advertisement

कोरोनाची लस तयार व्हायला लागणार एवढा वेळ

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनामुळे आत्तापर्यंत लाखो लोकांचा जीव गेला आहे

कोरोनाची लस तयार व्हायला लागणार एवढा वेळ

न्यूयॉर्क : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनामुळे आत्तापर्यंत लाखो लोकांचा जीव गेला आहे, पण अजूनही कोरोनावर उपचार करण्यासाठी लस सापडलेली नाही. औषध बनवणारी जागतिक कंपनी असलेल्या फायजरने कोरोनावरची लस तयार करायला ऑक्टोबर महिना उजाडू शकतो, असं सांगितलं आहे. फायजरचे सीईओ अल्बर्ट बोरला यांनी ही माहिती दिली आहे. फायजर जर्मन एमआरएनए कंपनी बायोएनटेकच्या मदतीने कोरोनाला रोखण्यासाठी बीएनटी १६२ लस तयार करत आहे. यासाठी अमेरिकेत आणि युरोपमध्ये परीक्षणही सुरू आहे. 

फायजरचे सीईओ अल्बर्ट बोरला या आठवड्यात इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चर्स एण्ड असोसिएशन (आयएफपीएमए)ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी झाले होते, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे. 

फियर्सबायोटेकने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात बोरला म्हणाले, 'जर गोष्टी व्यवस्थित झाल्या, तर ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत आमच्याकडे कोरोनावरची लस असेल.'

या कार्यक्रमात फायजरसोबतच एस्ट्राजेनेकाचे सीईओ पास्कल सोरियेट, ग्लॅक्सोस्मिथक्लाईनचे प्रमुख एमा वाल्स्ले, जॉनसन एण्ड जॉनसनचे मुख्य वैज्ञानिक अधिकारी पॉल स्टॉफल्सही सहभागी झाले होते. जगातल्या या सगळ्या दिग्गज कंपन्या कोरोनावर लस तयार करत आहेत. 

जीएसके सैनोफीसोबत, एस्ट्राजेनेका ऑक्सफर्ड विश्वविद्यालयासोबत, जॉनसन एण्ड जॉनसन अमेरिकेतल्या बायोमेडिकल ऍडव्हासन्सड रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट अथॉरिटीसोबत कोरोनाची लस तयार करत आहे. 

जगभरात कोरोनावर १२० पेक्षा जास्त लसी प्रस्तावित आहेत. तर क्लिनिकल ट्रायलमध्ये कमीतकमी १० लसी आहेत आणि ११५ लसींच क्लिनिकल ट्रायल आधीचं मूल्यांकन सुरू आहे. 

Read More