Marathi News> विश्व
Advertisement

चीननंतर आता दक्षिण कोरियात कोरोनाचा स्फोट

Covid-19 outbreak in South Korea : जगावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट आले आहे. कारण चीनपाठोपाठ दक्षिण कोरियामध्ये कोरोनाची लाट आली आहे. 

चीननंतर आता दक्षिण कोरियात कोरोनाचा स्फोट

सेऊल : Covid-19 outbreak in South Korea : जगावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट आले आहे. कारण चीनपाठोपाठ दक्षिण कोरियामध्ये कोरोनाची लाट आली आहे. दक्षिण कोरियामध्ये बुधवारी एका दिवसात कोरोनाचे तब्बल 4 लाख रुग्ण एका दिवसात आढळलेत. त्यामुळे दक्षिण कोरियामधले या घडीची रुग्णसंख्या तब्बल 76 लाखांवर गेली आहे. हा ओमायक्रॉनचा कहर समजला जात आहे. त्यामुळे कोरोनाला अजिबात हलक्यात घेऊ नका.(COVID-19 pandemic in South Korea)

राष्ट्राध्यक्ष मून जे-इन (Moon Jae-in) म्हणाले की, देशाला एका गंभीर समस्येचा सामना करावा लागला आहे आणि कोरोनाचा उद्रेक रोखण्याच्या लढाईत पुढील काही दिवस महत्त्वपूर्ण असतील. याआधी दक्षिण कोरियामध्ये कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे सहा लोकांचा मृत्यू झाला आहे. 600 हून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे.

चीनमध्ये कोरोनाने डोके वर काढले आहे. (Covid-19 outbreak) खबरदारी म्हणून शांघाय विमानतळ बंद करण्यात आला आहे. नव्या व्हेरियंटमुळे हाँगकाँगसह चीनमध्ये दररोज रूग्णवाढ होत आहे. त्यामुळे विमानतळ बंद करण्याचा निर्णय घेतला गेला.

चीनमध्ये कोरोनाच्या गुप्त ओमायक्रॉन व्हेरियंटने मोठे रूप धारण केले आहे. चीनमध्ये कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच रूग्णांची संख्या दररोड तब्बल 5 हजारांच्या पुढे गेली आहे. ओमायक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी चीन प्रशासनानं कडक पावलं उचलली आहेत. इथली 5 कोटी जनता घरांमध्ये कैद झाली आहे. 

चीनमध्ये आतापर्यंत 10 शहरांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. जगातली दुसऱ्या क्रमांकाची सर्वात उंच इमारत शांघाय टॉवरला सील करण्यात आले आहे.

Read More