Marathi News> विश्व
Advertisement

चीनचा ब्लॉगर चीन विरोधात खरं बोलला, तर त्या ब्लॉगरला एवढी मोठी शिक्षा

खरेतर गेल्या वर्षी जूनमध्ये गलवान घाटीमध्ये LAC वर भारत आणि चीनच्या सैन्यात चकमक झाली आणि या चकमकीत चीनच्या 40 हून अधिक सैनिकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली.

चीनचा ब्लॉगर चीन विरोधात खरं बोलला, तर त्या ब्लॉगरला एवढी मोठी शिक्षा

बीजिंग : भारतात आणि चीनमध्ये गलवान खाडीमध्ये (Galwan Valley Clash) झालेल्या चकमकीत (गॅलवान व्हॅली क्लेश) चीनी सैनिक मारले गेले. या लढाईच्या परिस्थिती बाबतीत प्रश्न चिन्ह उभारल्यानंतर एका लोकप्रिय चीनी ब्लॉगरला चीनने आठ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या ब्लॉगरने आपल्या लेखात 'चीनी नायक' आणि शहिदांचे नाव खराब केल्याचा आरोप शनिवारी त्याच्यावर लावण्यात आले आणि त्याला अटक झाली आहे.

खरेतर गेल्या वर्षी जूनमध्ये गलवान घाटीमध्ये LAC वर भारत आणि चीनच्या सैन्यात चकमक झाली आणि या चकमकीत चीनच्या 40 हून अधिक सैनिकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. परंतू या संख्येवर प्रश्न उपस्थित केल्याने चाऊ जिमिंगला (Chou Ziming) अटक झाली.

ब्लॉगर चाऊ जिमिंग मार्च 2021 मध्ये चीनच्या नवीन सौनिकी नियमाअंतर्गत दोषी ठरलेला पहिला व्यक्ती ठरला आहे. चीनच्या सीना वीबो (Sina Weibo) माइक्रोब्लॉगिंग अकाउंट वर चाउ जिमिंग ब्लॉगींग करतो आणि त्यावर त्याचे 25 लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.

त्यामुळे ही बातमी सर्वत्र पसरल्याने चीनी सौनिकांचा अपमान केल्याचा आरोप लावत चीनच्या कोर्टान 38 वर्षीय चाऊ जिमिंगला (Chou Ziming) आठ महिने तुरुंगावासा बरोबरच प्रसिद्ध सोशल मीडिया अकाउंटवर आणि नॅशनल मीडियावर 10 दिवसांच्या आत सर्वजनिक माफी मागण्यासाठी देखील सांगितले आहे.

fallbacks

चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या पिपल्स डेली वर्तमान पत्राने कोर्टाने दिलेल्या सुनावणीवर अहवाल दिला. ज्यामध्ये त्यांनी लिहिले की, 19 फेब्रुवारीला आपल्या सीना वीबो (Sina Weibo) अकाउंटवर चाऊ जिमिंगने (Chou Ziming) दोन प्रश्न उपस्थित केले, ज्यामुळे चीनी सौनिकांची बदनामी झाली. त्याच बरोबर या ब्लॉगरने जवानांच्या विरतेवर प्रश्न उभे केले आणि हा मॅसेज वेगाने इंटरनेटवर सर्कुलेट झाला.

ज्यामुळे देशाच्या अस्मितेला धक्का लागल्याचे सांगत त्याला कोर्टाकडून ही शिक्षा सुनावली गेली असल्याचे सांगितले गेले.

चाऊ हा माजी पत्रकार आहे. त्याने कायद्याचे शिक्षण देखील घेतले आहे. त्याने त्याच्या ब्लॉगमध्ये चीनी सरकारने चीनी सैनिकांच्या मृत्यूचा खरा आकडा लवपून ठेवल्याचा आरोप केला. त्यानंतर त्याला 1 मार्चला चीनी पोलिसांकडून अटक करण्यात आले. अटक झाल्यानंतर आधिकाऱ्यांनी एक पोस्ट शेअर केला, ज्यामध्ये चाऊ आपला अपराध स्वीकारताना आणि माफी मागताना दिसला.

Read More