Marathi News> विश्व
Advertisement

वाघाचा मुलावर झडप घालण्याचा प्रयत्न असा फसला; व्हिडिओ व्हायरल

वाघाने मुलावर झडप घालण्याचा प्रयत्न केला, पण...

वाघाचा मुलावर झडप घालण्याचा प्रयत्न असा फसला; व्हिडिओ व्हायरल

आयर्लंड​ : Dublin शहरातील एक हैराण करणारा व्हिडिओ समोर आला आहे. या शहरातील प्राणीसंग्रहालयात आलेला एक लहान मुलगा मोठी दुर्घटना होण्यापासून वाचला आहे. एक मुलगा प्राणीसंग्रहालयात फिरण्यासाठी आला होता. यावेळी त्याने वाघाच्या पिंजऱ्याबाहेर आपला फोटो काढण्यासाठी पोज देण्यास सुरुवात केली. मुलाच्या अगदी मागे एक वाघ उभा होता. तो सतत मुलाकडे पाहत घुरघुरत होता. अचानक मुलाला काही कळण्याआधी वाघाने मुलावर झडप घातली.

वाघाने मुलावर झडप घातली खरी पण, वाघ आणि मुलगा या दोघांमध्ये एक मजबूत काच होती. त्यामुळे मुलाला कोणतीही दुखापत झाली नाही. त्याचा जीव वाचला. परंतु या हल्ल्यामुळे लहान मुलगा घाबरला. आजूबाजूला असलेले सर्वच जण या हल्ल्यामुळे हैराण झाले. 

ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून व्हिडिओ व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांकडून या व्हिडिओवर विविध प्रतिक्रिया येत आहेत. काही लोक लहान मुलासाठी देवाला धन्यवाद देत आहेत, तर काही जण यावर मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. 

  

Read More