Marathi News> विश्व
Advertisement

जीव मुठीत घेऊन रिपोर्टींग करणाऱ्या चाँद नवाबनं पुन्हा वळवल्या नजरा, Video Viral

चांद नवाबच्या या अजब गजब रिपोर्टींगच खुप कौतुक होऊ लागलय..डेडिकेशन असावं तर चांद नवाब सारखं असं सर्व म्हणत आहेत..  

 जीव मुठीत घेऊन रिपोर्टींग करणाऱ्या चाँद नवाबनं पुन्हा वळवल्या नजरा, Video Viral

VIRAL VIDEO OF CHAND NAWAB IN FLLOD : चांद नवाब(Chand Nawab)  माहित आहे ना काही वर्षांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता आणि त्यानंतर चांद नवाबला तुफान  प्रसिद्धी मिळाली होती.

काही वर्षानंतर दिग्दर्शक कबीर खानच्या बजरंगी भाईजान(Bajrangi Bhaijaan) सिनेमात चांद नावाबचा हा फेमस सीन दाखवला होता. नुकताच चांद नावाबचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे आणि त्यालासुद्धा भरपूर लाईक केलं जात आहे.

.या व्हिडिओ मध्ये चांद नवाब पुराच्या पाण्यात अडकलेला दिसतोय पण तो मुद्दाम पुराच्या पाण्यात गेलाय आणि तेही चक्क रिपोर्टींग करायला असा हा व्हिडीओ आहे .

अगदी गळ्यापर्यंत पाणी आलाय मात्र पठ्ठा त्यातही पुराचे अपडेट्स  देताना दिसत आहे,चांद नवाबच्या या अजब गजब रिपोर्टींगच खुप कौतुक होऊ लागलय .. डेडिकेशन असावं तर चांद नवाब सारखं असं सर्व म्हणत आहेत.

 

Read More