Marathi News> विश्व
Advertisement

Japan tsunami : महाभयंकर भूकंपानंतर जपानमध्ये त्सुनामी; किनाऱ्यावर धडकल्या 5 मीटर उंच लाटा

Japan tsunami : संपूर्ण जग नव्या वर्षाच्या स्वागतात रमलेलं असतानाच जपानमध्ये मात्र एका वेगळ्याच संकटानं चिंता वाढवली आहे. यंत्रणाही या संकटाच्या पार्श्वभूमीवर सतर्क झाल्या आहेत.   

Japan tsunami : महाभयंकर भूकंपानंतर जपानमध्ये त्सुनामी; किनाऱ्यावर धडकल्या 5 मीटर उंच लाटा

Japan tsunami : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी जपानला भूकंपाचा जबर हादरा बसला असून, रिश्टर स्केलमध्ये या भूकंपाची तीव्रता 7.5 इतकी असल्याचं सांगण्या आलं. या महाभयंकर भूकंपानंतर जपानच्या पश्चिम भागामधील किनारपट्टी भागाल त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. जपानमध्ये या भूकंपानंतर समुद्रात अनेक हालचालींना वेग आला आणि एका क्षणात किनाऱ्यावर मोठमोठ्या लाटा धडकू लागल्या. जपानमधील इशिकावामध्ये 5 मीटर उंच लाटा धडकल्या. निसर्गाचं हे रौद्र रूप पाहून यंत्रणांनी नागरिकांना तातडीनं सुरक्षित स्थळी थांबत सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं. 

जपानमधील भूकंपानंतर इशिकावा, निगाता, तोयामा आणि यामागाता प्रांतांमधील नागरिकांना लवकरात लवकर या भागांतून स्थलांतरित होण्याचा इशारा देण्यात आल. NHKच्या माहितीनुसार हा भूकंप इतका मोठा होता की, टोक्यो आणि कांटो भागातही हादरे जाणवले. या संकटादरम्यानच नोटो बेटावर समुद्राच्या पोटामध्ये हालचालींना वेग आला आणि बंदरापर्यंत मोठाल्या लाटा धडकण्यास सुरुवात झाली. 

हेसुद्धा वाचा : क्रिकेट नव्हे, 'या' अनपेक्षित क्षेत्रात करिअर करतेय गांगुलीची लेक; पगार माहितीये का?

जपानमधील स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 4 वाजून 21 मिनिटांनी या देशातील किनारपट्टी भागांमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला. त्यामागोमाग टोयामा प्रांतात 4:35 वाजता 80 सेंटीमीटरच्या लाटा धडकल्या. तर, 4:36 वाजता या लाटा निगाटा प्रांतापर्यंत पोहोचल्या. यूनायटेड स्टेट्स जियोलॉजिकल सर्वेच्या माहितीनुसार अर्ध्या तासाच्या कालावधीत इथं दोनदा भूकंपाचे हादरे जाणवले. 

बुलेट ट्रेनही हादरल्या... 

जपानमधील भूकंपानंतर इशिकावा प्रांतातील रेल्वे स्थानकांवर उभ्या असणाऱ्या बुलेट ट्रेनही हादरल्या. यानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. सोशल मीडियावर या प्रसंगाचा व्हिडीओसुद्धा शेअर करण्यात आला. ज्यामुळं जपानमध्ये नेमकी किती गंभीर परिस्थिती उदभवली आहे हे पाहायला मिळालं. 

 

Read More