Marathi News> विश्व
Advertisement

तरुणाच्या गुप्तांगाला शार्कचा चावा, तरुणाचा मृत्यू

धक्कादायक

तरुणाच्या गुप्तांगाला शार्कचा चावा, तरुणाचा मृत्यू

नवी दिल्ली : समुद्रात मजा-मस्ती करायला सर्वांनाच आवडते. मात्र, समुद्रात पोहायला गेलेल्या एका १८ वर्षीय तरुणाला चांगलचं महागात पडलं आहे. ब्राझीलमधील १८ वर्षीय जोस एरनेस्टो सिल्वा हा समुद्रात पोहायला गेला असता असं काही घडलं ज्याचा विचार त्याने कधीच केला नसेल.

जोस एरनेस्टो सिल्वा समुद्रात पोहायला गेला असता त्याच्या शार्कने त्याच्या गुप्तांगाचा चावा घेतला. हा चावा इतका भयंकर होता की त्याच्या गुप्तांगाचा काही भागच शरारीपासून वेगळा झाला. इतकचं नाही तर या हल्ल्यात हा तरुण मृत्युमुखी पडला आहे.

'द सन' ने दिलेल्या वृत्तानुसार, तरुणाच्या गुप्तांगाला शार्कने चावा घेतला आणि हा प्रकार नागरिकांनी पाहतात त्यांनी तरुणाला समुद्रातून बाहेर काढलं. प्रकृती गंभीर असलेल्या या तरुणाला उपचाराकरीता रुग्णालयात दाखल केलं. मात्र, ऑपरेशन करुनही या तरुणाला वाचवण्यात डॉक्टर अपयशी ठरले.

Read More