Marathi News> विश्व
Advertisement

जगातील सर्वात 'क्यूट' कुत्र्याचा झोपेत मृत्यू

तुम्हाला जगातील सर्वात 'क्यूट' कुत्रा आठवतोय, त्या संबंधीत अत्यंत महत्वाची बातमी

जगातील सर्वात 'क्यूट' कुत्र्याचा झोपेत मृत्यू

मुंबई : सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असतं. असाच एका क्यूट कुत्र्याचा फोटो व्हायरल झाला होता या कुत्र्याला नेटीझन्सनी खूप छान प्रतिसाद दिला आहे तो जगातील सर्वात गोंडस असा 'क्यूट' कुत्रा ठरला. या 'क्यूट' कुत्र्याचं नाव 'बू'.  आता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे की, या 'बू' चं शनिवारी मध्यरात्री निधन झालं आहे. ही माहिती बू च्या मालकाने दिली असून या गोष्टीचा त्यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे. 'बू'च्या मालकाने दिलेल्या माहितीनुसार 2017 मध्ये 'बू'चा सर्वात जवळचा मित्र 'बडी'चं निधन झालं. त्यानंतर 'बू' खूप एकटा पडला. एकटेपणामुळे त्याला वेगवेगळ्या गोष्टींचा त्रास होत होता. जेव्हा 'बडी'चं निधन झालं तेव्हाच लक्षात आलं होतं की, 'बू' आता पूर्णपणे एकटा पडला आहे. 'बू' आणि 'बडी'जवळपास 11 वर्षे एकत्र राहिले आहेत. 

 

'बू' या क्यूट कुत्र्याला फेसबुक पेजवर 1 करोड 60 लाखहून अधिक लोकं फॉलो करतात. एवढंच नव्हे तर त्याच्या नावाने एक पुस्तकं देखील लिहिलं आहे. 'बू - द लाइफ ऑफ वर्ल्ड्स क्यूटेस्ट डॉग' असं या पुस्तकाचं नाव आहे. अमेरिकेत राहणाऱ्या 'बू'च्या मालकांनी ही अतिशय दुःखाची गोष्ट सगळ्यांसोबत शेअर केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, 'बू' आता त्याच्या अगदी जवळच्या मित्राला 'बडी'ला भेटायला गेला आहे. 

त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, आम्हाला या घटनेने खूप दुःख झालं आहे. पण आम्हाला या गोष्टीचं समाधान आहे की, 'बू' आता कोणत्याच त्रासात नसणार आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे, इंद्रधनुष्याच्या त्या तिथे पलिकडे 'बू' ला सर्वात अगोदर 'बडी' तिथे मिळणार आहे. खूप दिवसांनी एकमेकांना बघून ते नक्कीच आनंदी होतील.

Read More