Marathi News> विश्व
Advertisement

अरे देवा! दिवाळीच्या तोंडावरच बड्या कंपनीतील हजारो कर्मचारी नोकरीला मुकणार; Private Sector ला हादरवणारी बातमी

Job News : सध्याच्या दिवसांमध्ये खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांची काहीच शाश्वती देता येत नाही. तिथे मंदीच्या बातम्या येऊ लागताच इथे त्याच्या झळा पोहोचतात आणि कर्मचारी कपातीला सुरुवात होते. 

अरे देवा! दिवाळीच्या तोंडावरच बड्या कंपनीतील हजारो कर्मचारी नोकरीला मुकणार; Private Sector ला हादरवणारी बातमी

Job News : वर्षभरात ज्या सणाची आतुरतेनं वाट पाहिली जाते, तो सण अर्थात ती दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. पण, हा सण तोंडावर असतानाच एकिकडे दिवाळीला मिळणाऱ्या वाढीव पगाराची अनेकांना प्रतीक्षा असतानाच एका खासगी कंपनीच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी (Private sector employees) गंभीर बातमी समोर आली आहे. ही बातमी गंभीर असण्यापेक्षा ती चिंता वाढवणारी आहे असंच म्हणावं लागेल. कारण, जगभरात वाढत्या आर्थिक मंदीचं (Recession) सावट असल्यामुळं बऱ्याच बड्या कंपन्यांमध्ये कर्मचारीसंख्या कमी करण्यास सुरुवात झाली (Cost Cutting). याचीच पुनरावृत्ती आणखी एका मोठ्या खासगी कंपनीने केली आहे. (Big news for private sector jobs Intel Corp Layoff Plan revealed)

अधिक वाचा : Facebook कर्ताधर्त्या Mark Zuckerberg लाच दणका; जे घडलंय ते पाहून म्हणाल, 'कोण नाय कोणचं....'

सेमीकंडक्टर चिप निर्मिती क्षेत्रात असणाऱ्या इंटेल (Intel) या कंपनीकडून हजारो कर्मचाऱ्यांची छाटणी करण्यात येणार असल्याचं कळत आहे. ब्लूमबर्गचा हवाला देत रॉयटर्सनं दिलेल्या माहितीनुसार इंटेल कॉर्प (Intel Corp) त्यांच्या हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आणणार आहे. एका अहवालानुसार या कंपनीतून 20 टक्के कर्मचारीसंख्या कमी करण्यात येणार आहे.  सेल्स (Sales), मार्केटिंग (Marketing) आणि इतर विभागांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या संकटाला सामोरं जावं लागणार आहे. 

कंपनीच्या सेल्सचं प्रमाण घटलं... 
जुलै 2022 च्या वृत्तानुसार इंटेलमध्ये एकूण 1,13,700 कर्मचारी काम करत होते. कोरोना काळात या कंपनीच्या सेल्समध्ये जोरदार उसळी पाहायला मिळाली होती. पण, सध्या महागाईनं उच्चांक गाठलेला असताना शाळा आणि महाविद्यालयं सुरु झाली आहेत, पर्यायी संगणक आणि तत्सम उपकरणांची विक्री कमी झाली आहे. याचाच थेट परिणाम इंटेलच्या सेल्सवर झाला आहे. 

fallbacks

अधिक वाचा : आता घरपोच मिळवा 5G Sim Card, ते ही मोफत, जाणून घ्या

संगणकांचं सर्वात मोठं मार्केट असणाऱ्या चीनमध्ये कोरोनाच्या धर्तीवर पुन्हा निर्बंध लागू करण्यात आल्यामुळं आणि रशिया- युक्रेन युद्धामुळं Supply Chain मध्येही अडथळा असल्यामुळं मागणीवर याचे परिणाम दिसत आहेत. दरम्यान, इंटेलचे CEO पॅट गेलसिंगर (Pat Gelsinger) यांनी मंगळवारी कर्मचाऱ्यांना मेमो जारी केल्याचं कळत आहे. 

Read More