Marathi News> विश्व
Advertisement

भगवद् गीतेवर हात ठेवून शपथ घेण्यापासून बरंच काही...; PM Rishi Sunak यांची बातच न्यारी

सुनक यांच्या येण्यानं बऱ्याच गोष्टी ब्रिटनमध्ये पहिल्यांदाच घडल्या. त्या पहिल्यावहिल्या गोष्टी कोणत्या माहितीये?

भगवद् गीतेवर हात ठेवून शपथ घेण्यापासून बरंच काही...; PM Rishi Sunak यांची बातच न्यारी

Britain PM Rishi Sunak : पहिल्या आशियाई आणि भारतीय वंशाच्या (indian origin man) व्यक्तीकडे ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. ही व्यक्ती म्हणजे ऋषी सुनक. सध्या जागतिक घडामोडी आणि राजकारणामध्ये सुनक यांच्याच नावाची चर्चा सुरु आहे. Penny Mordaunt यांना पराभूत करत सुनक यांनी देशाची सूत्र आपल्या हाती घेतली. ब्रिटनमध्ये सुरु असणाऱ्या राजकीय उलथापालथीला या घटनेमुळे अखेर काहीसा विराम मिळण्याची चिन्हं सध्या स्पष्ट होत आहेत. या सगळ्यामध्ये सुनक यांच्यासाठी सुरु असणाऱ्या कौतुकाचा वर्षा काही केल्या थांबताना दिसत नाहीये.

अधिक वाचा : Rishi Sunak: पसारा घालणारी बायको अन् पंतप्रधान नवरा... प्रेमात सगळं काही माफ असतं!

- 1980 मध्ये जन्मलेल्या सुनक एका मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाचे मोठे झाले. मेहनत आणि जिद्द त्यांनी लहानपणापासूनच अंगी बाणवली. दुकानात काम करत, लोकांना औषधं पोहोचवत, वेटर म्हणून काम करत मी मोठा झालो असं ते प्रचारादरम्यान म्हणाले होते.

- भगवद् गीतेवर (bhagwad gita) असणाऱ्या विश्वासामुळे सुनक यांनी भारताची ही परंपरा ब्रिटनमध्येही सुरु ठेवली. गीतेवर हात ठेवून ठपथ घेणारे ते ब्रिटनचे पहिले अर्थमंत्री होते. ‘मी सध्या ब्रिटनचा नागरिक आहे. पण, मी हिंदू आहे. माझी धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख भारतीय आहे. मी गर्वाने म्हणतो की मी हिंदू आहे, माझी ओळख हिंदू म्हणूनच आहे’, असं ते म्हणाले होते.

- तुम्हाला माहितीये का, पंतप्रधानपदी असणाऱ्या सुनक यांनी वर्णभेदाला शह दिला. ते इथले पहिले Nonwhite PM ठरले आहेत.

- वयाच्या अवघ्या 42 व्या वर्षी त्यांच्याकडे या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अतिशय कमी वयात त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आल्यामुळे सारं जग त्यांच्याकडे अपेक्षेनं पाहत आहे.

- ब्रिटनमधल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सुनक यांचं नाव गणलं जातं. ते युकेचे सर्वात श्रीमंत खासदार आणि आता पंतप्रधान ठरले आहेत.

Read More