Marathi News> विश्व
Advertisement

Old Age Porn Star: एकेकाळचा फादर ८३ व्या वर्षी बनला पॉर्न स्टार, दिलं हे कारण

 एका चर्चच्या फादरने जॉब सोडत थेट पॉर्न स्टार बनण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरीकेतली ही घटना असून या घटनेची चर्चा खुप रंगलीय.  

Old Age Porn Star: एकेकाळचा फादर ८३ व्या वर्षी बनला पॉर्न स्टार, दिलं हे कारण

मुंबई : आयुष्यात करीयरचे गोल अचिव्ह करण्यासाठी प्रत्येकजण जॉब स्विच करत असतो. मात्र एखाद्याने वयाच्या 83 व्या वर्षी जॉब स्विच केला तर आश्चर्य वाटेलच.मात्र याहून धक्कादायक म्हणजे एका चर्चच्या फादरने जॉब सोडत थेट पॉर्न स्टार बनण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरीकेतली ही घटना असून या घटनेची चर्चा खुप रंगलीय.  

नॉर्म सेल्फ असे 83 वर्षीय फादरचे नाव आहे. अमेरीकेच्या नॉर्थ कॅरोलिनाचे ते रहिवासी आहेत. पॉर्न स्टार बनण्यापूर्वी नॉर्म एका चर्चमध्ये फादर होते.नॉर्म ख्रिश्चन धर्माचा प्रचार प्रसार करायचे. मात्र वयाच्या 83 वर्षी नॉर्मने पॉर्न फिल्म स्टार बनण्यासाठी नोकरी सोडली. 

पॉर्न स्टार बनण्याचा अनुभव  
फादरची नोकरी सोडल्यानंतर नॉर्म सेल्फ एका Adult Movie त दिसले. 2017 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातून नॉर्म यांना आलेला अनुभव शेअर केला आहे.  नॉर्म म्हणतात की, खुप उशिरानंतर कळाले की, मी समलिंगी (Gay) आहे. त्यानंतर मी Adult Movie करण्याचा निर्णय घेतला. नॉर्म पुढे म्हणतात की,सेक्स हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम अनुभव आहे. तसेच यापूढे Adult Movie मध्ये करणे सुरुच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.  

लैंगिक शिक्षणाबद्दल काय म्हणाले ? 
नॉर्म सेल्फ यांनी लोकांना लैंगिकतेबद्दल शिक्षित करण्यात मला आनंद होत असल्याचं सांगितलं. तसेच हे करिअर वृद्धांसाठी नसल्याची टीका करणाऱ्यांवर त्यांनी संताप व्यक्त केलाय.  

Read More