Marathi News> विश्व
Advertisement

VIDEO : अमेरिकेत पडलीये इतकी थंडी ही मगरीही गोठल्या...

कडाक्याच्या थंडीने गारठलेल्या अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामधील एक व्हिडीओ समोर आलाय. हा व्हिडीओ पाहून थंडीमुळे तेथील परिस्थितीचा अंदाज तुम्हाला येईल. थंडीमुळे तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेय.

VIDEO : अमेरिकेत पडलीये इतकी थंडी ही मगरीही गोठल्या...

नवी दिल्ली/वॉशिंग्टन : कडाक्याच्या थंडीने गारठलेल्या अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामधील एक व्हिडीओ समोर आलाय. हा व्हिडीओ पाहून थंडीमुळे तेथील परिस्थितीचा अंदाज तुम्हाला येईल. थंडीमुळे तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेय.

या व्हिडीओमध्ये कडाक्याच्या थंडीमुळे संपूर्ण नदीच गोठली गेलीये. इतकंच नव्हे तर या नदीमधील मगरीही गोठल्याचे व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

शॅलोट रिव्हर स्वॅम्प पार्कचा आहे हा व्हिडीओ

हा व्हिडीओ उत्तर कॅरोलिनाच्या ओशन इस्ले बीचस्थित शॅलोट रिव्हर स्वॅम्प पार्कने जारी केलाय. या व्हिडीओमध्ये भीषण थंडीमुळे नदी गोठली गेलीये. त्यासोबतच मगरीही गोठल्यात. 

बर्फात अडकेल्या मगरींची सुटका करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचेही व्हिडीओत दिसतेय. थंडीच्या या कडाक्यात जिवंत राहण्यासाठी मगरींनी बर्फाबाहेर तोंड काढले असून त्याद्वारे ते श्वास घेण्याचा प्रयत्न करतायत. 

 

मगरी -४० डिग्री तापमानातही जिवंत राहू शकतात

पार्कने ब्लॉगस्पॉटमध्ये म्हटलंय की, मगरी -४० डिग्री तापमानातही जिवंत राहू शकतात. दरम्यान थंडीच्या दिवसांत त्या झोपेच्या मुद्रेत असतात. पार्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कॅरोलिनामध्ये अशा प्रकारची थंडी नेहमीच पडते. मात्र यंदाच्या वर्षी जरा जास्तच थंडी पडलीये आणि हे चित्र पहिल्यांदाच पाहायला मिळालेय. तब्बल साडेतीन लाखाहून अधिक वेळा हा व्हिडीओ पाहिला गेलाय. तर ४ हजार लोकांनी हा व्हिडीओ शेअर केलाय.

Read More