Marathi News> विश्व
Advertisement

इथं नेमकं करायचं काय? बेडच्या बाजूला कमोड असणारी रुम पाहून साऱ्यांचीच सटकली!

Airbnb With Toilet Next To Bed: ऑनलाइन माध्यमातून बूक केलेल्या या रुमचं डिझाइन पाहून अनेकांना हे काय आहे असा प्रश्न पडला आहे. हजारो लोकांनी ही पोस्ट पाहिली असून या रुमची रचना पाहून बरेच प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

इथं नेमकं करायचं काय? बेडच्या बाजूला कमोड असणारी रुम पाहून साऱ्यांचीच सटकली!

Airbnb With Toilet Next To Bed: तंत्रज्ञानाच्या वापरामुळे अनेक क्षेत्रांमध्ये अमुलाग्र बदल झाला आहे. आज अगदी घरबसल्या कोणतीही वस्तू ऑनलाइन माध्यमातून मागवू शकतो. याच ऑनलाइन माध्यमांमुळे प्रवास, भटकंतीही अगदी सहज शक्य झाली आहे. हॉटेल व्यवसायाने तर तंत्रज्ञानाच्या मदतीने कात टाकली आहे. मात्र त्याचबरोबर या क्षेत्रातील स्पर्धाही दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. अनेक हॉटेल्स ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सूट, सवलती आणि आकर्षक पॅकेजेसबरोबर वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरत असतात. मात्र कधीतरी काहीतरी हटके करण्याच्या नादात असं काहीतरी करुन ठेवतात की पाहणारेही क्षणभर गोंधळात पडतात. काहीतरी वेगळा अनुभव मिळेल या अपेक्षेने जाणाऱ्या ग्राहकांना समोरील दृष्य पाहून धक्काच बसतो. असाच काहीसा प्रकार समोर आला असून एका हॉटेलच्या रुमचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

बेडपासून हाताच्या अंतरावर कमोड

एका व्यक्तीने ट्विटरवर एक फोटो शेअर केला असून तो पाहून अनेकांना हे काय आहे? असा प्रश्न पडला आहे. अनेकांनी या डिझाइनची खिल्ली उढवली आहे. असा विचार करा की तुम्ही ऑनलाइन एखाद्या हॉटेलची रुम बूक केली. त्या रुममध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या बेडच्या बाजूलाच कमोड दिलं असेल तर? म्हणजे सामान्यपणे बेडवर झोपल्यानंतर आपण हाताच्या अंतरावर मोबाईल ठेवतो तितक्या अंतरावर कमोड असल्याचं व्हायरल फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. हा फोटो शेअर केला आहे. डेव्हिड हॉल्ट्स नावाच्या व्यक्तीने. डेव्हिडने ट्वीटरवर एक फोटो शेअर केला आहे. त्याने बूक केलेल्या एका हॉटेलचा मुख्य रुम हा एखादं मोठं बाथरुमच वाटत आहे. यामागील कारण म्हणजे या रुममधील कमोड हा बेडच्या बाजूला आहे. त्यामुळे या कमोडची जागा चुकल्याऐवजी बेडच बाथरुममध्ये ठेवल्यासारखं वाटत आहे. 

हे असं काय डिझाइन केलंय?

या रुममध्ये कमोड बेडच्या बाजूला असून बेडच्या समोरच पारदर्शक काच असलेला शॉवर रुम देण्यात आला आहे. हा सारा प्रकार पाहून या व्यक्तीला आश्चर्याचा धक्काच बसला. ही रुम डेव्हिडने एअरबीएनबीवरुन बूक केली होती. यासंदर्भात त्याने तक्रार दाखल केल्यानंतर कंपनीने संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. मात्र डेव्हिडने या रुमचा फोटो ट्वीटरवर पोस्ट केल्यानंतर अनेकांनी का हा रुम असा डिझाइन केलाय असा प्रश्न पडला आहे. हा फोटो अमेरिकेतील कॅलिफॉर्नियातील असल्याचं सांगितलं जात आहे. इथं नेमकं करायचं काय असा प्रश्न अनेकांना हा फोटो पाहून पडला आहे.

fallbacks

अनेकांनी हा फोटो पाहून वेबसाईटवरील रुमच्या फोटोंवर विश्वास ठेऊन कोणतंही बुकींग करु नये असा सल्ला दिला आहे. तर काहींनी या रुमचं भाडं देऊ नये असा सल्ला डेव्हिडला दिला आहे. ही हटके रुम पाहून तुम्हाला काट वाटलं ते कमेंटमध्ये नक्की कळवा. या पोस्टला 2 हजारांहून अधिक इम्प्रेशन मिळाले आहेत.

Read More