Marathi News> विश्व
Advertisement

विसरा सगळं! कोरोनामागोमाग आणखी भयंकर आजाराची साथ; Stree Food वर बंदी

करावं तरी काय ? 

विसरा सगळं! कोरोनामागोमाग आणखी भयंकर आजाराची साथ; Stree Food वर बंदी

मुंबई : बदलत्या ऋतुचक्रासोबतच गेल्या काही वर्षांमध्ये आजारांची रुपही बदलताना दिसत आहे. 2019 च्या अखेरपासून जगावर असणारा कोरोनाचा विळखा अद्यापही नाहीसा झालेला नाही. त्यातच आता आणखी एका आजारानं डोकं वर केलं आहे. या आजारामुळं प्रशासनही सतर्क झालं असून त्या धर्तीवर मोठा निर्णयही घेण्यात आला आहे. (after corona Cholera outbreak in Kathmandu read details)

हा मोठा निर्णय म्हणजे रस्त्यावर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांवरील बंदी. हातावर पोट असणाऱ्यांसाठी अशी दुकानं मोठी फायद्याची. पण, आता स्वस्तात खायला मिळणंही बंद होणार असल्यामुळं समाजातील एका वर्गापुढे अडचणी उभ्या राहिल्या आहेत. 

हा निर्णय घेण्यात आला आहे, नेपाळमधील काठमांडू इथं. कॉलरा या आजाराची पसरणारी साथ पाहता ती रोखण्यासाठीचा उपाय म्हणून काठमांडू खोऱ्यात असणाऱ्या रेहडी ट्रॅक परिसरात Street Food वर बंदी घालण्यात आली आहे. 

काठमांडू मेट्रोपोलिटन सिटी (KMC) कडून हा निर्णय घेण्यात आला आहे. सदर भागात रविवारी रुग्णसंख्या वाढल्यामुळं हा निर्णय घेतला गेला. या आदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांवर रितसर कारवाई करण्यात येणार आहे. 

fallbacks

स्वच्छता राखण्याचं आवाहन 
काठमांडू येथील प्रशासकीय यंत्रणांकडून रेस्तराँ आणि हॉटेलांनाही स्वच्छता राखण्याचे निर्देश दिले आहेत. पिण्याच्या पाण्याची जलवाहिनीसुद्धा स्वच्छ ठेवण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. 

नेपाळमध्ये जाणाऱ्या पर्यटांसाठीही काठमांडू हे ठिकाण महत्त्वाचं ठरतं. पण, अशा पर्यटकांनीसुद्धा सदर परिस्थिती पाहता सुरक्षिततेची काळजी घ्यावी. 

Read More