Marathi News> विश्व
Advertisement

Shocking: नवऱ्याने असं काय केलं? दुसऱ्याच दिवशी नवरी कायमची सोडून निघून गेली

Viral News: लग्न म्हणजे दोन जीवांचं आणि दोन कुटुंबियांचे मिलन असते. लग्नात सगळेच धमाल, मज्जामस्ती करतात. त्यातून आपणही आपल्या लग्नात (Marriage) मिळेल ती धम्माल करण्याच्या बेतात असतो. केक कटिंग रेसेमनी ही हल्ली सगळ्याच लग्नात पाहायला मिळते. परंतु नुकत्याच आलेल्या एका बातमीनुसार, केक कटिंग सेरेमनी (Cake Cutting Ceremony) ही एका कपलला चांगलीच महागात पडली आहे. 

Shocking: नवऱ्याने असं काय केलं? दुसऱ्याच दिवशी नवरी कायमची सोडून निघून गेली

Viral News: लग्न म्हणजे दोन जीवांचं आणि दोन कुटुंबियांचे मिलन असते. लग्नात सगळेच धमाल, मज्जामस्ती करतात. त्यातून आपणही आपल्या लग्नात (Marriage) मिळेल ती धम्माल करण्याच्या बेतात असतो. केक कटिंग रेसेमनी ही हल्ली सगळ्याच लग्नात पाहायला मिळते. परंतु नुकत्याच आलेल्या एका बातमीनुसार, केक कटिंग सेरेमनी (Cake Cutting Ceremony) ही एका कपलला चांगलीच महागात पडली आहे. आपल्या लग्नात केक कटिंग सेरेमनी ठेवणं या कपलसाठी महागात पडलं. लग्नात असे अनेक क्षण असतात ज्यामुळे पती - पत्नी (Husband and Wife) हे अजून एकत्र येतात. त्यातून आपल्यालाही ते क्षण पाहून अजून आनंद होतो. परंतु एका लग्नात मात्र केक कटिंग सेरेमनीतल्या एका चूकीमुळे चक्क एका कपलचा घटस्फोटचं (Divorce) झाला आहे. त्यामुळे त्यांच्या नात्यात एक वेगळा दरारा पाहायला मिळला आहे. पण नेमकं असं त्या एका केक कटिंग सेरेमनीमध्ये असं काय झालं की, क्षणात त्यांचा घटस्फोट झाला. (a newly wed wife gave divorce to her husband as she didnt obey her demand what really happened)

ही घटना अमेरिकेतील आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, येथे एका कपलचे लग्न झाले. हे दोघं रिलेशिनशिपमध्ये होते. त्यांनी आपल्या रिलेशनशिपला (Relationship) पुढे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आणि मग त्यांनी एकमेकांसोबत लग्न करायचे ठरवले. आपल्या नातेवाईकांशीही त्यांनी आपल्या नात्याबद्दल सांगितले होते आणि त्यांच्या लग्नाबद्दलही त्यांना काहीच अडचण नसल्यामुळे त्यांनी लग्न (Marriage Viral News) करायचे ठरवले आणि मग त्यांनी एक रिसेप्शनही ठेवले. त्या रिसेप्शनमध्ये केक कटिंग सेरेमनी ठेवला परंतु तिथे मात्र त्या दोघांचा घटस्फोट झाल्याचेच समोर आले. 

त्यांचे लग्न झालं आणि मग त्यांनी एकमेकांच्या रिसेप्शनसाठी (Reception) चांगला मोठा केक आणला होता आणि ते दोघंही आपल्या लग्नाचा केक कापण्यासाठी पुढे आले. तेव्हा त्या नववधूनं त्याच्या नवऱ्याला सांगितलं की, तू माझ्या चेहऱ्याला अजिबातच केक लावून नकोस परंतु त्या नवऱ्यानं काही त्याचं ऐकलं नाही आणि त्यानं चक्क तिचं तोंड त्या केकमध्ये (Cake on Face) बुडवलं. त्याचा त्या वधूला प्रचंड राग आला तर दुसरीकडे तू माझ्या चेहऱ्याला केक लावू नकोस असं बायकोनं म्हटल्यानं तर नवऱ्याला खूपच वाईट वाटलं हे पाहून तर नव्या नवरीला अजूनच राग आला. 

हेही वाचा - Kolhapuri Chappal: नादखुळा! वारसा जपत पुण्यातील कुटुंबियांनी बनवली 5 फूटांची कोल्हापूरी चप्पल

आत्ता माझं ऐकतं नाही संपुर्ण आयुष्य काय ऐकणार? 

हा प्रकार भर लग्नात घडल्यानं (VIRAL VIDEO) नवरीला आपला राग आवरता आला नाही. ती म्हणाली की, आमच्या लग्नात तो माझी एक छोटीशी गोष्ट ऐकू शकला नाही तर संपुर्ण आयुष्यात माझं काय ऐकणार आहे, त्यामुळे अशा माणसासोबत मला काही राहायचं नाही म्हणत तिनं आपल्या नवऱ्याला घटस्फोट दिला.  

Read More