Marathi News> विश्व
Advertisement

अफगाणिस्तानात नवे युद्ध पेटणार! तालिबान आणि आयसिस-के यांच्यात संघर्ष उफाळणार

Taliban war : अफगाणिस्तानात (Situation in Afghanistan) तालिबान्यांनी (Taliban) कब्जा केल्यानंतर आता तिथं तालिबान (Taliban) आणि आयसिस-के (ISIS-k) यांच्यात संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे. 

अफगाणिस्तानात नवे युद्ध पेटणार! तालिबान आणि आयसिस-के यांच्यात संघर्ष उफाळणार

मुंबई : Taliban war : अफगाणिस्तानात (Situation in Afghanistan) तालिबान्यांनी (Taliban) कब्जा केल्यानंतर आता तिथं तालिबान (Taliban) आणि आयसिस-के (ISIS-k) यांच्यात संघर्ष उफाळण्याची शक्यता आहे. दोन्ही दहशतवादी (Terrorist ) गट कट्टर अमेरिकाविरोधी (America) असले तरी त्यांच्यात विस्तवही जात नाही ही वस्तूस्थिती आहे. नेमका काय आहे हा वाद, पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट 

अमेरिकेचा ISIS वर एअर स्ट्राइक, काबूल स्फोटानंतर अ‍ॅक्शन मोडमध्ये US

रक्तपात घडवत तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर (Afghanistan Crisis) कब्जा केला खरा मात्र आता तिथं त्यांच्या जुन्या शत्रूनं डोकंवर काढले आहे. ज्याचं नाव आहे आयसीस के अर्थात खोरासन गट. काबूलमध्ये दोन बॉम्बस्फोट घडवत आयसीसनं आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. त्यामुळे तालिबान्यांच्या पायाखालची वाळू सरकलीय. खरं तर दोन्ही गट जिहादी..दोघांची विचारधारा एक, शत्रू एक. मात्र जेव्हा दोन्ही गट आमने सामने येतात तेव्हा घडतो फक्त नरसंहार, असेच दिसून आले आहे.

आयसीसचा खोरासन गट हा अफगाणिस्तानच्या नांगरहर प्रदेशातील आहे. 2012 साली जिहादींनी या गटाची निर्मिती केली. त्यानंतर 2014 साली पश्चिम आशियात आयसीस म्हणजेच इस्लामिक स्टेटची स्थापना झाली. पुढे खोरासन गट त्यात सामील झाला. आयसीसचं सर्वात घातक मॉडेल म्हणून आयसीस-केकडे पाहिले जाते. हा गट तालिबानचा कट्टर शत्रू मानला जातो. तालिबानमधील असंतुष्ट पाकिस्तानी आणि अफगाणी तरूणांना खोरासन गट आपल्यात सामील करून घेतो. 

 सध्या अफगाणिस्तानात प्रचंड अफरातफर माजलीय. यानिमित्तानं आपलं अस्तित्व दाखवण्याची संधी आयसीस-केनं साधली आहे. तालिबानपेक्षा आयसीस-केचा धोका अधिक आहे याची जाणीव अमेरिकेलाही होती. त्यामुळे तालिबान्यांचा बंदोबस्त करण्याआधी अमेरिकनं फौजांनी एअरस्ट्राईक करत खोरासन गटाला ठेचून काढलं. मात्र आता अमेरिकन फौजा अफगाणिस्तानातून परततायेत. त्यामुळेच आयसीस केनं आपलं डोकंवर काढले आहे. तालिबान विरूद्ध आयसीस के संघर्ष पेटला तर अफगाणिस्तानची पुन्हा स्मशानभूमी होणार, अशी चर्चा सुरु झाली आहे. 

Read More