Marathi News> विश्व
Advertisement

....म्हणून या तरुणाने विमानतळावरच परिधान केले १० शर्ट आणि ८ पॅन्ट

जर तुम्ही विमानाना प्रवास करता तर तुमच्यासोबत असलेलं सामान घेऊन जाण्यासाठी काही नियम ठरवले आहेत. जर तुम्हाला निर्धारित वजनापेक्षा अधिक सामान घेऊन जायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा चार्ज द्यावं लागतं.

....म्हणून या तरुणाने विमानतळावरच परिधान केले १० शर्ट आणि  ८ पॅन्ट

नवी दिल्ली : जर तुम्ही विमानाना प्रवास करता तर तुमच्यासोबत असलेलं सामान घेऊन जाण्यासाठी काही नियम ठरवले आहेत. जर तुम्हाला निर्धारित वजनापेक्षा अधिक सामान घेऊन जायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा चार्ज द्यावं लागतं.

मात्र, एका प्रवाशाकडे एक्स्ट्रा लगेजसाठी लागणारे पैसे नव्हते आणि त्यासाठी त्याने एक विचित्र आयडिया शोधून काढली. पण ही आयडिया फ्लॉप झाली आणि तो पकडला गेला. 

रेयान विलियम्स नावाचा व्यक्ती आइसलँडहून इंग्लंडला आपल्या घरी जात होता. ज्यावेळी एअरपोर्टवर चेकइन करण्यासाठी तो पोहोचला त्यावेळी ब्रिटिश एअरलाईन्सने त्याच्याकडून एक्स्ट्रा लगेजचे चार्जेस मागितले. एक्स्टा लगेजसाठी विलियम्सजवळ १२५ डॉलर म्हणजेच जवळपास ८००० रुपये नव्हते. त्यामुळे विलियम्सने एक शक्कल लढवली. 

विलियम्सने एक्स्ट्रा लगेजमधील सर्व कपडे परिधान करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे त्याने १० टी-शर्ट आणि ८ पॅंट परिधान केले. त्यानंतर तो फ्लाईटमध्ये जाण्यास निघाला. मात्र, त्यावेळी त्याला रोखण्यात आलं. 

विलियम्सने सांगितलं की, ज्यावेळी तो ब्रिटिश एअरलाईन्सच्या फ्लाईटमध्ये जाण्यास निघाला त्यावेळी त्याला मज्जाव करण्यात आला. स्थानिक वृत्तवाहिनीने सांगितले की, विलियम्सने असभ्य वर्तन केलं होतं त्यामुळे त्याला विमानात प्रवास करण्यास नकार दिला. विलियम्सने या प्रकरणाचे व्हिडिओ शूट केले असून ट्विटरवर शेअर केले आहेत.

तर तिकडे ब्रिटिश एअरलाईन्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आम्ही प्रवाशांना सामान घेऊन जाण्यासाठी अनेक पर्याय देतो. आपल्या पॉलिसीनुसार विलियम्सलाही ऑफर दिली होती. 

विलियम्सने यानंतर दुसऱ्या फ्लाईटमधून जाण्याचा प्रयत्न केला मात्र, त्या फ्लाईटमधूनही प्रवास करण्यास त्याला परवानगी दिली नाही. अखेर नॉर्वे एअरलाईन्सच्या फ्लाईटने तो ब्रिटनमध्ये पोहोचला.

Read More