Marathi News> विश्व
Advertisement

Marriage Story : एका लग्नाची गोष्ट! 19 वर्षाच्या तरूणीने रिक्षावाल्याशी बांधली लग्नगाठ

Rickshaw driver and girl passenger marriage : रिक्षावाला (Auto Driver) शकील आणि समीनामध्ये प्रवासा दरम्यानच प्रेम फुलले होते. यानंतर दोघांनी मिळून एकमताने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार 60 वर्षाच्या शकीलने 19 वर्षाच्या समीनासोबत मोजक्या पाहूण्यांच्या उपस्थितीत लग्नगाठ (wedding story) बांधली. 

 Marriage Story : एका लग्नाची गोष्ट! 19 वर्षाच्या तरूणीने रिक्षावाल्याशी बांधली लग्नगाठ

Rickshaw driver and girl passenger marriage : प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, असे म्हटले जाते. मात्र प्रत्येक लव्हस्टोरी अशी असेलच असे सांगता येत नाही. काही लव्हस्टोरीस (Love Story) याला अपवाद ठरतात. अशीच एक लव्हस्टोरी समोर आली आहे. ही लव्हस्टोरी खुपच आगळीवेगळी आहे. या लव्हस्टोरीत एका 19 वर्षीय तरूणीने एका 60 वर्षाच्या व्यक्तीसोबत लगीनगाठ (wedding story) बांधलीय. या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा आहे.  

असे प्रेमात पडले

या घटनेत 60 वर्षीय व्यक्ती शकील हा एक रिक्षावाला  (Auto Driver) आहे. दररोज तो रिक्षा चालवून आपले घरखर्च चालवत असतो. एके दिवशी असेच पॅंसेंजरच्या शोधात असताना त्याला 19 वर्षीय समीना मिळाली. या समीनाला घेऊन तो तिच्या ठिकाणी जात होता.या प्रवासा दरम्यानच दोघांमध्ये प्रेम जुळलं होते.

रिक्षावाल्याची 'ही' गोष्ट आवडली?

रिक्षावाला (Auto Driver) शकील रिक्षा चालवत असताना त्याला समीना नावाची एक पँसेजर मिळाली होती. या समीनाला घेऊन तो  तिने सांगितलेल्या ठिकाणी नेत होता. पण प्रवासा दरम्यानच मध्येच रिक्षा खराब झाली. यावेळी शकीलने समीनाला पैसे न देण्याचे सांगत, दुसऱ्या रिक्षाने घरी जाण्याचा सल्ला दिला होता. मात्र समीनाने रिक्षा प्रवासाचेच नाही तर रिक्षाच्या दुरूस्तीचे देखील पैसै दिले होते. 

या एका घटनेनंतर शकिलने साधारण 2-3 महिने समीनाकडून रिक्षा प्रवासाचे (Auto Driver) पैसैच घेतले नाही आणि तिला मोफत प्रवास घडवला. या प्रवासा दरम्यान दोघांमध्ये चांगलीच मैत्री झाली होती. या मैत्रीचे रूपांतर नंतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 

लग्नाच्या बेडीत अडकले

रिक्षावाला (Auto Driver) शकील आणि समीनामध्ये प्रवासा दरम्यानच प्रेम फुलले होते. यानंतर दोघांनी मिळून एकमताने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार 60 वर्षाच्या शकीलने 19 वर्षाच्या समीनासोबत मोजक्या पाहूण्यांच्या उपस्थितीत लग्नगाठ (wedding story) बांधली. दोघांच्या वयात साधारण 41 वर्षाचे अंतर होते.मात्र वयाचे हे बंधन झूंगारून ते लग्नाच्या बेडीत अडकले. यानंतर त्यांच्या लग्नाची चर्चा आता रंगली आहे.

fallbacks

दरम्यान ही घटना पाकिस्तानमध्ये घडली आहे. पाकिस्तानचा (Pakistan) युट्यूबर सय्यद बासिक अलीनं या जोडप्याची मुलाखत घेतली होती.या मुलाखतीत या जोडप्याने आपली लव्हस्टोरी सांगितली आहे. या लव्हस्टोरीची सोशल मीडियावर एकच चर्चा आहे. 

Read More