Marathi News> विश्व
Advertisement

17 वेळा गर्भवती असल्याचे दाखवून सरकारकडून लाखो रुपये उकळले, एक चूक अन् बिंग फुटले

Trending News In Marathi: एका महिलेने सरकारी योजनेचा फायदा घेण्यासाठी तब्बल 17 वेळा गरोदर असल्याचा दावा केला होता. यानंतर तिने सरकारी योजनेंतून रक्कम देखील मिळवली होती. 

17 वेळा गर्भवती असल्याचे दाखवून सरकारकडून लाखो रुपये उकळले, एक चूक अन् बिंग फुटले

Trending News In Marathi:  एका महिलेने मातृत्वाचा लाभ घेण्यासाठी पाच मुलं आणि 12 वेळा गर्भपात झाल्याचा खोटा दावा केला. महिलेने खोटो कागदपत्र देत आत्तापर्यंत तब्बल 110,000 यूरो म्हणजेच जवळपास 98 लाख रुपयांचा सरकारी लाभ घेतला. मात्र एका चुकीमुळं तिचे पितळ उघडे पडले आहे. इटलीत ही घटना घडली आहे. या घटनेने सरकारी यंत्रणांमध्येही खळबळ उडाली आहे. 

स्थानिक वृत्तसंस्थेंनी दिलेल्या माहितीनुसार, 50 वर्षांच्या बारबरा इओले असं या महिलेने नाव आहे. तब्बल 24 वर्षांपासून ती सरकारसोबत खोटं बोलत आहे. सरकारला धोका देत सरकारी योजनांचा फायदा उठवत आहे. बारबराने दावा केला होता की, तिने पाच मुलांना जन्म दिला असून 12 वेळा तिचा गर्भपात झाला. त्यामुळं सरकारी योजनेतून तिला 98 लाखाहून अधिक रक्कम मिळाली. त्याव्यतिरिक्त तिने प्रेग्नेंसी आणि ऑबोर्शनच्या नावाखाली मातृत्वाची रजादेखील घेतली होती. 

पाचव्या गरोदरपणात आला संशय 

आरोपी महिलेने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात एका मुलाला जन्म दिल्याचे म्हटलं होतं. आणि हाच धागा पकडत तिचे खोटो उघडे पडले. अधिकाऱ्यांनी सत्य शोधण्यास सुरुवात केली की, महिलेने खरंत इतक्या मुलांना जन्म दिला आहे का? पण तिचे बिंग फुटले आणि पाचवं गरोदरपण हे एक नाटक असल्याचे समोर आले. 

रिपोर्टमध्ये समोर आले आहे की, गरोदर असल्याचे सर्वांना लक्षात यावे म्हणून ती पोटाला उशी बांधून फिरत असे. इतकंच नव्हे तर ती इतर गर्भवती महिलांप्रमाणे चालण्याची नक्कलदेखील करत होते. जेणेकरुन कोणाला तिच्यावर संशय यायला नको. मात्र, तिचे हे खोटे उघडकीस आले. 

महिलेने रोममधील एका रुग्णालयातून जन्म प्रमाणपत्र चोरी करुन अवैध पद्धतीने त्याचा वापर केला. तसंच या घोटाळ्यासाठी अनेक प्रकारचे खोटे प्रमाणपत्र बनवून घेतले. आरोपी महिलेच्या पाच मुलांना कधीच कोणी बघितले नाही, हे कोर्टातदेखील सिद्ध झाले आहे. तसंच, मुलांच्या जन्म आणि ओळखपत्राचे कोणतेही कायदेशीर प्रमाणपत्र आढळले नाहीयेत. 

माफीचा साक्षीदार बनून शिक्षा कमी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर महिलेचा पती डेव्हिड पिज्जिनाटो यानेही तिच्याविरोधात साक्ष दिली. त्याने म्हटलं आहे की त्याची पत्नी कधीच गर्भवती नव्हती. मात्र, इतकं होऊनही महिला तिने पाच मुलांना जन्म दिला असून 12 वेळा गर्भपात झाल्याच्या दाव्यावर अडून होती. 

दीड वर्षांचा तुरुंगवास

महिलेवर राज्य सरकारने सरकारी योजनेचा गैरफायदा घेऊन संप्पती मिळवल्याचा आणि 14 वर्षांच्या नोकरीत बनावट कागदपत्रे दाखवून मॅटरनिटी लिव्ह घेण्याचा आरोप केला आहे. तिला सर्व आरोपांमध्ये दोषी सिद्ध करुन दीड वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे. 

Read More